आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी संसदेत जोरदार गोंधळ केल्याने दोन्ही सभागृह मंगळवार सकाळपर्यँत स्थगित करण्यात आले आहे. इस्त्रायली कंपनी पेगासस सॉफ्टवेअरच्या मदतीने केल्या जाणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणावरुन विरोधीपक्षांनी संसदेत जोरदार राडा केला. काँग्रेसने यावेळी फोन टॅपिंग प्रकरणाबाबत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सरकार पेगासस सॉफ्टवेअरद्वारे पत्रकारांसह नामांकित व्यक्तींची हेरगिरी करीत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. 16 मीडिया ग्रुपच्या संयुक्त तपासणीनंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. परंतु, सरकारने या सर्व आरोपांचे खंडन करताना या लीक डेटाचा हेरगिरीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे हे लोकशाहीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे सरकारने संसदेत म्हटले आहे.
लोकशाहीला बदनाम करण्याचे षडयंत्र - आयटी मंत्री वैष्णव
केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रविवारी रात्री एका वेब पोटर्लने अतिशय खळबळजनक स्टोरी प्रकाशित केली होती. ज्यामध्ये सरकारवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात होण्याच्या एक दिवसाआधी ही स्टोरी समोर आली आहे. त्यामुळे हे काही योगायोग असू शकत नाही असे वैष्णव यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, यापूर्वीही व्हॉट्स अॅपवर पेगाससच्या वापरासंदर्भांत असेच दावे करण्यात आले होते. परंतु, ते सर्व दावे निराधार असल्याने त्याला सर्वांनी नाकारले. 18 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालात भारताच्या लोकशाहीची आणि इतर संस्थांची प्रतिमा डागळण्याचे प्रयत्न दिसत असल्याचे वैष्णव यांनी म्हटले आहे.
हेरगिरी आणि बेकायदेशीर पाळत ठेवण्याविरूद्ध कठोर कायदे
आपल्या देशात हेरगिरी आणि बेकायदेशीर पाळत ठेवण्याविरूद्ध आपल्या देशात कठोर कायदे आहे. त्यामुळे देशांतग्रत असे करण्यासाठी एक प्रणाली असल्याचे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन कोणत्याही इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाचे निरीक्षण करताना नियम व कायद्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते.
भारतीय टेलीग्राफ कायदा 1885 च्या कलम (२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 69 च्या तरतुदींनुसार इलेक्ट्रॉनिक संप्रेषण रोखले जाऊ शकते, परंतु सक्षम प्राधिकरणाने मंजूर केल्यानंतरच असे करता येईल.
पेगासस म्हणजे काय?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.