आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Opportunity For Disaster Affected Students Again, Announcement Of Union Education Minister Dharmendra Pradhan

जेईई मेन्स:आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना पुन्हा संधी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील अतिवृष्टी, पूरग्रस्त आणि नैसर्गिक आपत्तीशी झुंजणाऱ्या भागांतील विद्यार्थ्यांना केंद्राने मोठा दिलासा आहे. या भागांतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसाठीची प्रवेश परीक्षा जेईई मेन्सला बसण्यासाठी दुसरी संधी मिळणार आहे. केंद्रीय शिक्षणंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी ही घोषणा केली.

प्रधान ट्विटरवर म्हणाले, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील जे विद्यार्थी २५ आणि २७ जुलैला होणाऱ्या जेईई मेन्स सेशन ३ परीक्षेसाठी पोहाचू शकणार नाहीत, त्यांना घाबरण्याची गरज नाही. त्यांना पुन्हा एक संधी मिळेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) नव्या तारखांची लवकरच घोषणा केली जाईल. जेईई मेन्सच्या तिसऱ्या सत्रासाठी २०,२२,२५ आणि २७ जुलैच्या तारखा निश्चित आहेत. एनटीएने आधीच २० व २२ जुलैला तिसऱ्या सत्राची परीक्षा घेतली होती. जेईई मेन्ससाठी देशभरात ७ लाख ९,५१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...