आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Opposition Calls For Celebrating Modi's Birthday As 'National Unemployment Day'; Hashtag 'NationalUnemploymentDay' On Trend

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांचा वाढदिवस:मोदींचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करण्याचे विरोधकांचे आवाहन; 'NationalUnemploymentDay' हॅशटॅग ट्रेंडमध्ये

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दाढी नाही रोजगार वाढवा, तरुणांचा पंतप्रधानांना सल्ला

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 70 वा वाढदिवस आहे. भाजपच्या वतीने मोदींचा हा वाढदिवस 'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नवाटप, मास्क वाटप, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्यासोबतच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याची तयारी भाजपच्या वतीन करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. यासाठी त्यांनी आवाहन केले आहे. या आवाहनाला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. आज रात्री 12 नंतर काही तासांतच #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस आणि NationalUnemploymentDay हे हॅशटॅग भारतात ट्रेंड होत आहेत. #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस या हॅशटॅगवर अवघ्या काही तासांमध्ये दोन लाख 28 हजार ट्विट करण्यात आले आहेत. तर #NationalUnemploymentDay या हॅशटॅगवर 8 लाख 37 हजार ट्विट करण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या, रोजगार गेले असून बेरोजगारांची संख्या वाढली आहे. अशात भाषण नको रोजगार द्या, दाढी नाही रोजगार वाढवा, ते दोन कोटी रोजगार कुठे गेले असे अनेक मुद्दे सोशल मीडियावर मांडत मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत अनेकांनी #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस हा हॅशटॅग वापरून सरकारला सवाल केले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser