आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Opposition Protest March UPDATES; Rahul Gandhi | Shiv Sena, Praful Patel On Kisan Andolan And Pegasus Spyware Controversy; News And Live Updates

विरोधकांनी सभागृहाचा गोंधळ आणला रस्त्यावर:राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण - राहुल गांधी; असे वाटते की आपण पाकिस्तानाच्या बॉर्डरवर आहोत - शिवसेना

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संसदेतील गदारोळामुळे नायडू व्यथित

पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सुमारे 15 विरोधी पक्षांनी संसदेपासून विजय चौकापर्यंत पदयात्रा काढली. अधिवेशनाचा जास्तीत जास्त वेळ गदारोळात निघून गेला. विरोधी पक्ष अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदा आणि महागाईवरुन आक्रमक होते. दरम्यान, विरोधकांनी सरकार लोकशाही सन्मानाचा भंग केल्याचा आरोप केला.

दरम्यान, राज्यसभेत प्रथमच खासदारांना मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे. यावितिरिक्त शिवसेना, राष्ट्रवादी, राजद, समाजवादी पक्ष, द्रमुक आणि इतर विरोधी पक्षांनी बुधवारी राज्यसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यमान सरकारने लोकशाहीची हत्या केल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

हे विधेयक खासदारांनी नव्हे तर मार्शल लॉद्वारे पारित - विरोधी पक्ष
​​राहुल गांधी म्हणाले की, पावसाळी अधिवेशन संपले असून आम्ही पेगाससचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, आम्ही सरकारला आव्हान देत यावर चर्चा करण्यास सांगितले. परंतु, सरकारने आमचे ऐकले नाही, आम्हाला संसदेत बोलण्याची परवानगीदेखील दिली गेली नाही. त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर आलो आहोत. मोदी देशाचा आत्मा विकत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली.

संसद अनिश्चित काळासाठी ढकलली पुढे
संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले आहे. दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेतील सततच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज 13 ऑगस्टऐवजी 11 ऑगस्टला स्थगित करण्यात आले. राज्यसभेत 28% आणि लोकसभेत 22% कामकाज झाले. तर दुसरीकडे लोकसभेत 96 तासांपैकी 74 तास वाया गेले. यामुळे करदात्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

संसदेतील गदारोळामुळे नायडू व्यथित
संसदेचे पावसाळी अधिवेशन दोन दिवस अगोदरच बुधवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. बुधवारी सकाळी राज्यसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा सभापती वेंकय्या नायडू यांनी मंगळवारच्या घटनेचा भावुक होत उल्लेख केला. ते म्हणाले, ‘एक दिवस आधी सभागृहात लोकशाहीचे पावित्र्य नष्ट करण्यात आले. त्या गोष्टीमुळे व्यथित झालोय. माझ्याकडे शब्द नाहीत. रात्रभर झोपूही शकलो नाही.’ लोकसभेत ओम बिर्ला यांनी कामकाजातील व्यत्ययाचा उल्लेख करून कामकाज चालवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...