आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपवर राऊतांचा हल्लाबोल:म्हणाले- सरकार पाडण्यासाठी विरोधक देव पाण्यात ठेवून बसले, भाजपने फक्त तारखावर तारखाच दिल्या

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या विरोधकांनी मोठे खटाटोप केले, भाजपने तारखावर तारखा दिल्या पण सरकार पडलेच नाही. सरकार पाडण्यासाठी विरोधक देव पाण्यात ठेवून बसले आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ते आज माध्यमांशी बोलत होते.

सर्व निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. माजी खासदार शिवाजी आढावराव पाटीलच लोकसभा सदस्य होतील असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अयोध्या आमच्यासाठी नवी नाही

अयोध्येतील बाबरी पाडल्यावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात श्रेयवाद सुरु असून त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा निशाणा साधला. ते म्हणाले, शिवसेनेसाठी अयोध्या नवी नाही, गेली 30 वर्षे आम्ही अयोध्येत जात आहोत. त्यामुळे आम्ही तिथे जाणार आहोत भोंगा मुद्द्यावर राऊत म्हणाले की, राज ठाकरेंनी कोणता मुद्दा घेतला हा संशोधनाचा विषय आहे असा टोलाही राऊत यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार सुडीच्या भावनेने राज्य सरकारसोबत वागत आहे.

आमचं अख्खं आयुष्य पेटवा-पेटवीत गेलं

आमचं अख्खं आयुष्य पेटवा-पेटवीत गेलं असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना फटकार लगावली. ते म्हणाले ''सवाल ये नही की बस्तीया क्यो जली, सवाल ये है की बंदर के हात मे माचिस किसने दि? अशा शब्दात त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.

माचिस देऊनही पेटायला तयार नाही

माचिस देऊनही ते पेटायला तयार नाही. आता पेटेल उद्या पेटेल -परवा पेटेल पण पेटतच नाही, त्याचे कारण म्हणजे दारूगोळा शिवसेनेकडे आहे. पेटण्यासाठी आतून आग असावी लागते. मनगटात धग असावी लागते, ती बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या मनात आणि मनगटात निर्माण केली असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...