आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Opposition Swells, Demands For Talks On China Border; Congress Will Follow The Policy Of Participation In The Work

संसदेचे हिवाळी अधिवेशन:विरोधकांची महागाई, चीन सीमेवरील चर्चेची मागणी; काँग्रेस कामकाजात सहभागाचे धोरण अवलंबणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १७ बैठकांत १६ विधेयके आणण्याची तयारी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेस चर्चेचे धोरण अवलंबणार आहे. पक्ष अधिवेशन काळात दररोज एक नवा मुद्दा घेऊन येईल. मात्र, भारत जोडो यात्रेतील व्यग्रतेमुळे राहुल गांधी अधिवेशनातील कोणत्याही कामकाजात भाग घेऊ शकणार नाहीत. मंगळवारी सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यात काँग्रेससह सर्व प्रमुख पक्षांचे नेते सहभागी होते. विरोधकांनी महागाई, बेरोजगारी, चीन सीमेवरील स्थिती, सरकारी संस्थांचा दुरुपयोग, एम्सवरील सायबर हल्ला, काश्मीर पंडितांवरील हल्ले, ईडब्ल्यूएस कोटासह विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी वेळ मागितला आहे. २९ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात १७ बैठका होतील. सरकार १६ विधेयक सादर करेल.

टीएमसी नेत्याने संस्थांच्या दुरुपयोगाच्या मुद्द्याची केली मागणी टीएमसीच्या नेत्याने सरकारी संस्थांचा दुरुपयोग व राज्यांच्या आर्थिक नाकेबंदीवर चर्चा करण्याची मागणी केली. बीजू जनता दल नेत्याने महिला आरक्षण विधेयक, शिवसेनेने लोकसंख्या नियंत्रण विधेयक, संजय सिंह यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...