आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Opposition To Meet President On Farm Bills On Wednesday, Sharad Pawar Rahul Gandhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलन:शरद पवार, राहुल गांधींसह विरोधीपक्षांचे शिष्टमंडळ आज घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट, शेतकरी आंदोलनाविषयी करणार चर्चा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 14 वा दिवस आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरम आहे. शेतकरी आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत. या विषयावर राजकारणही तापले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (9 डिसेंबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या विरोधीपक्षातील दिग्गजांचे शिष्टमंडळ संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपतींची भेट घेतील.

सध्या देशातील वातावरण तापले आहे. दरम्यान विरोधीपक्षांचे शिष्टमंडळ शेतकरी आंदोलनावर राष्ट्रपतींसोबत चर्चा होणार आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारला निर्देशित करण्याबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणी नेत्यांकडून केली जाणार आहे. पवार याविषयी म्हणाले की, 'राष्ट्रपतींना भेटण्यापूर्वी ते विविध राजकीय पक्षांसोबत या कायद्यांच्या मुद्द्यावर चर्चा करतील' शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. मात्र ही भेट कृषी कायद्याविषयी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान आज दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 14 वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये अनेक बैठकी झाल्या. मात्र त्यातून तोडगा निघालेला नाही. दरम्यान मंगळवारी झालेल्या भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शरद पवार आणि राष्ट्रपतींच्या भेटीत शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा केली जाणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser