आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅगन नीती:जिनपिंग यांना विरोध नापसंत, प्रतिमा उजळवण्यासाठी 30 लोकशाही देशांपैकी 18 देशांतील प्रसारमाध्यमांवर दबाव

दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनचे राष्ट्रपती म्हणून तिसऱ्यांदा विराजमान होण्यासाठी शी जिनपिंग यांनी ऑक्टोबरमध्ये कम्युनिस्ट पार्टीची बैठक आयोजित केली आहे. कोरोनाकाळ, मानवी हक्काची प्रकरणे आणि विस्तारवादाच्या रूपातील आपली नकारात्मक प्रतिमा बदलण्यासाठी चीन नवनवीन क्लृप्त्या आजमवू लागले आहे. अमेरिकेतील फ्री स्पीच थिंक टँक फ्रीडम हाऊसच्या अहवालानुसार ३० लोकशाही देशांपैकी १८ देशांतील प्रसारमाध्यमांवर चीनने दबाव टाकला आहे.

त्यात बहुतांश आफ्रिकन देश आहेत. या १८ देशांतील सोशल मीडियापासून पत्रकार आणि माध्यम संस्थांपर्यंत चीनच्या बाजूने लेखन करावे, वातावरण तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. अंतर्गत माहिती बाहेर जाण्यापासून रोखण्यात आली. त्यासठी मीडिया मॅनेजमेंटसाठी ७५ लाख कोटी रुपयांची तरतूदही केली.

परदेशातील पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी

जिनपिंग सरकारच्या विरोधात लेखन करणाऱ्या जगभरातील पत्रकारांना चीन धमक्या देत आहे. अनेक पत्रकार व संस्थांनी आपल्या बातम्यांसाठी फिल्टर लावले आहेत. चिनी-अमेरिकन पत्रकार व चिनी-ऑस्ट्रेलियन संशोधकांनी काही गुप्त बाबी उजेडात आणल्या. त्यानंतर त्यांना सायबर धमक्या मिळण्यास सुरुवात झाली. युरोपात वास्तव्याला असलेले पत्रकार म्हणाले, चीनच्या विरोधात बातम्या देणाऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील धोका होऊ शकतो.

२०१९ नंतर प्रतिमा जगभरात डागाळली

२०१९ नंतर चीनबद्दल परदेशातील लोकांची मानसिकता आणखी नकारात्मक झाली आहे. त्यातही कोरोना महामारीदरम्यान बीजिंगमध्ये अनेक घटना घडल्या. त्यामुळे माध्यमांचे लक्ष वेधले गेले. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चीनच्या या रणनीतीला तोंड देण्यासाठी मीडिया हाऊस व राजकीय पुढाऱ्यांना देखील पुढाकार घ्यावा लागेल. पारदर्शकता व पत्रकारांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची ठरेल.

प्रशांत क्षेत्रातील पाच बेटांवर चीनचेच पोलिस

ऑस्ट्रेलियाजवळील सॉलोमन बेटासह पाच बेटांवरील देशात चीनची पोलिस यंत्रणा सक्रिय आहे. त्यासाठी चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना या देशांच्या दौऱ्यावर पाठवले होते. तूर्त पोलिस यंत्रणेतील तैनाती स्थानिक लोकांची आहे. परंतु त्याचा कारभार चीनचे अधिकारी हाकू लागले आहेत. चीनच्या विरोधातील कोणत्याही प्रचाराला रोखण्याचे काम ते करतात. चीन माहितीला सेन्सर करते.

आफ्रिकेत ७०% ४ जी नेटवर्क चीनचे

चीनची आफ्रिकेतील अनेक देशांत सुमारे १६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक. तंत्रज्ञान क्षेत्रावर भर. चीनने इथिओपिया व युगांडाला ३ लाख कोरोना लसी, सोमालिया आणि केनियाला २ लाख मोफत डोस दिले.

जिबुजीसारख्या लहानशा आफ्रिकन देशात चीनने १४ प्रकल्पांत सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

बातम्या आणखी आहेत...