आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Opposition Will Embroil The Government In The Spy Purchase Case; BJP Boycotts Parliamentary IT Committee Meeting Today; News And Live Updates

पेगासस हेरगिरी प्रकरण:हेरगिरी सॉफ्टवेअर खरेदी प्रकरणात विरोधक सरकारची कोंडी करणार; संसदेच्या आयटी समितीची बैठक आज, भाजपने टाकला बहिष्कार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वीलेखक: मुकेश कौशिक
 • कॉपी लिंक
 • पावसाळी अधिवेशन : दिवसभरात सात वेळा कामकाज स्थगित

पेगासस मुद्द्यावर माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीची बुधवारी बैठक होणार आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीच्या बैठकीवर भाजप सदस्यांनी बहिष्कार टाकला. भाजप खासदार व या समितीचे सदस्य जफर इस्लाम म्हणाले, नियमानुसार बैठकीचा अजेंडा जाहीर केला जाऊ नये. परंतु बैठकीपूर्वी तो जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकत आहोत.

ही बैठक संसदेचे अधिवेशन सुरू असल्याच्या दरम्यान बोलावण्यात आली आहे. परंतु थरूर यांच्यासह विरोधी पक्षांतील खासदार बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीच्या विषयपत्रिकेनुसार नागरिकांच्या डेटाच्या संरक्षणाबाबत मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदवणे बाकी आहे. त्यात माहिती-तंत्रज्ञान, गृह, दूरसंचार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. समितीत २९ सदस्य आहेत.

काही प्रश्न असे
स्पायवेअर खरेदीचा अधिकार कोणत्या मंत्रालयास दिला? हेरगिरी कोणत्या कारणांमुळे झाली? सरकारने सुरक्षा कारणांमुळे परदेशी कंंपन्यांकडून हेरगिरी सॉफ्टवेअरची खरेदी केली. उत्तर होकारार्थी असल्यास कोणकोणत्या सॉफ्टवेअरचा समावेश आहे? ते

कोठून खरेदी करण्यात आले?

 • सरकारने इस्रायली कंपनीकडून पेगासस सॉफ्टवेअर खरेदी केले का?
 • पेगासस खरेदीची प्रक्रिया ग्लोबल टेंडरद्वारे करण्यात आली. तसे असल्यास त्यात कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश होता?
 • पेगासस सॉफ्टवेअर कोणत्या मंत्रालयाने खरेदी केले?
 • स्पायवेअरचा वापर करण्यासाठी कोणते मंत्रालय अधिकृत करण्यात आले आहे?
 • विरोधी नेते, मंत्री, पत्रकार व इतर व्यक्तींच्या विरोधात पेगाससचा वापर सरकारच्या पातळीवर झाल्यास कोणत्या कारणांनी हे पाऊल उचलले?

विरोधकांकडून नाकेबंदी

 • काँग्रेसची टीम : अध्यक्ष शशी थरूर, कार्ती चिदंबरम, शक्तीसिंह गोहिल, सय्यद नासिर हुसेन.
 • घेरण्यासाठी साथ : जयदेव गल्ला (टीडीपी), धैर्यशील माने (शिवसेना), महुआ मोइत्रा (तृणमूल), नदीमुल हक (तृणमूल), पीआर नटराजन (माकप).
 • तटस्थ : भाजपला मूक पाठिंबा : सुमनलता अंबरीश (अपक्ष), नरेंद्र जाधव, सुरेश गोपी.

पावसाळी अधिवेशन : दिवसभरात सात वेळा कामकाज स्थगित
पेगासस हेरगिरी व कृषी कायद्यांवरून संसदेत मंगळवारी गदारोळ झाला. दोन्ही मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे दोन्ही सभागृहांत कामकाज होऊ शकले नाही. दुपारी ३.३० वाजेपर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज सात वेळा स्थगित करावे लागले. लोकसभा अध्यक्ष आेम बिर्ला व राज्यसभा सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी कामकाज होऊ न शकल्याने चिंता व्यक्त केली.

विरोधकांच्या भूमिकेबाबत पंतप्रधान मोदी यांनी भाजप खासदारांशी संवाद साधला. विरोधक संसदेचे कामकाज चालू देत नाहीत. ही बाब खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जनतेसमोर मांडावी, असे आवाहन मोदींनी संसदीय दलाच्या बैठकीत केले. तत्पूर्वी सकाळी लोकसभेत मॉरिशसचे माजी पंतप्रधान जगन्नाथ यांना श्रद्धांजली अर्पण केली. सोबतच झाम्बियाचे पहिले राष्ट्रपती केन्नेथ डेव्हिड बुचिज्या काँडादेखील उपस्थित होते. त्यानंतरही विरोधी घोषणाबाजी होते.

बातम्या आणखी आहेत...