आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Option Of Five Indian Languages; Starting From 14 Engineering Colleges In Eight States; News And Live Updates

आता मराठीतूनही इंजिनिअरिंग:पाच भारतीय भाषांचा पर्याय; आठ राज्यांतील 14 अभियांत्रिकी महाविद्यालयांतून सुरुवात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रादेशिक भाषांतून अभियांत्रिकी शिक्षण स्वागतार्ह, आव्हानात्मकही

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी यानिमित्त शिक्षण क्षेत्रातील काही नव्या योजनांचा शुभारंभ केला. इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आता प्रादेशिक भाषांत सुरू केल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, आता ८ राज्यांतील १४ अभियांत्रिकी महाविद्यालये ५ भारतीय भाषांमध्ये इंजिनिअरिंग शिकवण्यास सुरुवात करत आहोत. यात हिंदी, मराठी, तामिळ तेलगू आणि बंगाली भाषेचा समावेश आहे. इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाचा ११ भारतीय भाषांत अनुवाद करण्यासाठी एक विशेष टूलही विकसित करण्यात आले आहे.

नव्या शैक्षणिक धोरणात माध्यमिक पातळीवर विषय म्हणून भारतीय सांकेतिक भाषा अभ्यासक्रम विशेष उल्लेखनीय आहे.पंतप्रधानांनी या अभ्यासक्रमाची सुरुवात करत सांगितले की, सांकेतिक भाषेला प्रथमच एका विषयाचा दर्जा देण्यात आला आहे. आता विद्यार्थी तो एक भाषाविषय म्हणून अभ्यासू शकतील. यामुळे दिव्यांगांना मोठा फायदा होणार आहे. मोदींनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित वेबसाइट सुरू केली. तसेच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा शुभारंभ केला. ती उच्च शिक्षणात अनेक पर्याय उपलब्ध करेल.

प्रादेशिक भाषांतून अभियांत्रिकी शिक्षण स्वागतार्ह, आव्हानात्मकही
प्रादेशिक भाषांमधून अभियांत्रिकी शिक्षणाची घोषणा स्वागतार्ह, पण तेवढीच आव्हानात्मक आहे. चीन, जपान, कोरिया आदी देशांनी मातृभाषेतूनच उच्च शिक्षण ही संकल्पना यशस्वी केली. पण त्यापूर्वी सर्व आशय व संदर्भ साहित्य मातृभाषेतून उपलब्धतेची मोहीम त्यांनी राबवली. आपल्याकडे मातृभाषेतून शिकणाऱ्यांची संख्या कमी आहे. यामुळे उच्च शिक्षणासाठीचे सर्व शैक्षणिक साहित्य मातृभाषेतून उपलब्ध करणे अपरिहार्य ठरेल. त्यासाठी अनुवाद व नव्याने स्वतंत्र लेखन ही आव्हाने आहेत. -डाॅ. राजेंद्र पाटील, प्राचार्य, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे

या नव्या योजनांचाही केला प्रारंभ

  • ग्रेड-१ च्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचे नाटक आधारित शालेय तयारी मॉड्यूल
  • सीबीएसई शाळात ग्रेड-३, ५ आणि ८ यासाठी एक योग्यता आधारित मूल्यांकन अाराखडा राबवला जाणार.
  • कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) केंद्रित खास वेबसाइट.
बातम्या आणखी आहेत...