आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टाचे आदेश:स्वामी चिन्मयानंद यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद सरस्वती हे सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही गुरुवारी शहाजहांपूरच्या विशेष एमपी-एमएलए कोर्टात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करून ९ डिसेंबर रोजी कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

चिन्मयानंद यांच्याविरोधात त्यांच्या शिष्येने २०११ मध्ये लैंगिक शोषणाची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यांचे वकील कोर्टात म्हणाले, चिन्मयानंदांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यावर ६ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना हजर होण्यासाठी सूट देण्यात यावी. मात्र, कोर्टाने त्यांना सूट देण्यास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...