आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:सेवेतील डॉक्टरांच्या कोट्यामधील 50% जागा भरण्याचे तामिळनाडूला आदेश

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने नीट उत्तीर्ण झालेल्या सेवेतील उमेदवारांना चालू शैक्षणिक वर्षासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत ५०% सुपरस्पेशालिटी जागा वाटप करण्यासाठी तामिळनाडू सरकारला शुक्रवारी परवानगी दिली. न्या. बी. आर. गवई आणि न्या. विक्रम नाथ यांच्या पीठाने राज्य सरकारला ७ नाेव्हेंबर २०२० च्या आदेशानुसार, १५ दिवसांत जागा भरण्याचे निर्देश दिले.

राज्य सरकारने सुपरस्पेशालिटी जागांवर २०२० च्या सरकारी आदेशाचा (जिओ) बचाव केला होता. पीठ म्हणाले, तामिळनाडू राज्याने १६ मार्च २०२२ च्या आदेशाच्या स्पष्टीकरणासाठी कोर्टात धाव घेतली होती की, संबंधित आदेश याचिकांच्या निपटाऱ्यापर्यंत सर्व शैक्षणिक वर्षांसाठीही लागू होईल. आम्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकला. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) ऐश्वर्या भाटी म्हणाल्या, गेल्या वर्षी सेवेतील उमेदवारांसाठी आरक्षित अनेक जागा भरल्या जाऊ शकल्या नाहीत. सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रम बहुमूल्य राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ती व्यर्थ केली जाऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...