आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत जोडो यात्रेत केजीएफ-2 चित्रपटाचे संगीत परवानगी शिवाय वापरण्यात आले असल्याने बेंगळुरू येथील न्यायालयाने ट्विटरला काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल तात्पुरते ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी KGF-2 ची म्युझिक लेबल कंपनी MRT म्युझिकने राहुल गांधींसह काँग्रेसच्या तीन नेत्यांविरोधात कॉपीराइट नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. काँग्रेसने बेकायदेशीरपणे चित्रपटातील संगीत वापरल्याचे प्रथमदर्शनी न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिल्याने कॉग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
परवानगी न घेता वापरले गाणे -
MTR कंपनीचे व्यवस्थापक एम नवीन कुमार यांनी यशवंतपूर, बंगळुरू येथे एक एफआयआर मध्ये असा उल्लेख केला आहे की, भारत जोडो यात्रा कर्नाटकातून जात असताना यात्रेच्या प्रमोशनमध्ये केजीएफ-2 चे गाणे - समुंदर में लहर उठी है जिद्दी जिद्दी है तूफान चट्टानें भी कांप रही है जिद्दी जिद्दी है तूफान... हे गाणे परवानगी न घेता वापरले गेले आहे. त्यासाठी कंपनीकडून परवानगी घेण्यात आली नाही. कंपनीने सांगितले की, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दोन व्हिडिओ ट्विट केले ज्यामध्ये गाणे वापरले गेले होते.
म्युझिक कंपनीचा आरोप
म्युझिक कंपनी MTR म्हणते – KGF 2 च्या हिंदी आवृत्तीचे हक्क मिळवण्यासाठी कंपनीने निर्मात्यांना मोठी रक्कम दिली होती, परंतु काँग्रेसने राजकीय अजेंडा आणि जाहिरात हेतूंसाठी कोणताही परवाना न घेता भारत जोडो यात्रा मोहिमेत साउंडट्रॅकचा वापर केला.
या कलमांन्वये गुन्हा दाखल
राहुल गांधी, राज्यसभा खासदार जयराम रमेश आणि काँग्रेस सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेट यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 403, 465, 120 बी आणि कॉपीराइट कायद्याच्या 63 प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर होऊ शकते 3 वर्षांचा तुरुंगवास
एखादे काम प्रकाशित आणि कॉपी करण्याच्या अधिकाराला प्रताधिकार अधिकार म्हणतात. हा अधिकार पुस्तके, चित्रपट, गाणी, नाटके, ट्रेड मार्क इत्यादींच्या बाबतीत आहे. पुस्तकांच्या संदर्भात, ते लेखकाच्या आयुष्यभर आणि त्याच्या मृत्यूनंतर 50 वर्षे टिकते. कॉपीराइट कायदा 1957 लेखकांच्या कार्यांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
कॉपीराइट कायदा 1957 कलम 63 नुसार 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,000 ते 3 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे. कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्यास आरोपीचा मोबाईल, लॅपटॉप किंवा सिस्टीम पोलिस वॉरंटशिवाय जप्त करू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.