आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभर उष्ण तापमान:ओरिएंट इलेक्ट्रिकने  लाँच केला क्लाऊड फॅन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेड, २.४ अब्ज वैविध्यपूर्ण सीके बिर्ला समूहाचा एक भाग, क्लाउड ३ लाँच केले आहे, क्लाउडचिल तंत्रज्ञानाद्वारे समर्थित अशा प्रकारचा पहिला कुलिंग फॅन आहे. ओरिएंट क्लाउड ३ फक्त थंड हवाच देत नाही तर खोली थंड करण्यासही सक्षम आहे. जवळजवळ वर्षभर उष्ण तापमान क्लाउड ३ फॅनला भारतीय घरांसाठी एक आदर्श पर्याय बनवते.

आकर्षक डिझाईनसह, ओरिएंट क्लाउड ३ कुलिंग फॅनमध्ये ४.५-लिटर पाण्याची टाकी आहे, जी ८ तास न थांबता थंड हवा पुरवते. हा पंखा हवेचे तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत कमी करू शकतो. क्लाउड ३ फॅनच्या लाँचबद्दल भाष्य करताना, ओरिएंट इलेक्ट्रिकचे एमडी आणि सीईओ राकेश खन्ना म्हणाले, “आम्ही ग्राहक केंद्रित नवोपक्रमासाठी वचनबद्ध आहोत, ज्यामुळे आम्ही सतत नाविन्यपूर्ण आणि प्रीमियम दर्जाची उत्पादने बाजारात आणतो. आम्ही अद्वितीय क्लाउड चिल तंत्रज्ञानासह क्लाउड ३ फॅन लाँच करून संपूर्ण नवीन श्रेणी सादर केली आहे.

जेव्हा तापमान ३४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त अतसे, तेव्हा पंख्याचा परिणाम होत नाही. हे लक्षात घेऊन आम्ही हा अभिनव पंखा विकसित केला आहे. क्लाउड ३ फॅन हवेचे तापमान १२अंश सेल्सिअसपर्यंत कमी करतो. या फॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे ब्रीझ मोडच्या माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या ब्रीझचा अनुभव घेता येणार आहे. हे दोन फिनिशमध्ये उपलब्ध आहे - पांढरा आणि काळा. हा पंखा घरे, दुकाने, कार्यालये आणि इतर लहान जागांसाठी योग्य आहे. ओरिएंट क्लाउड ३ सुरुवातीला अमेझॉनवर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल आणि नंतर निवडक रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध होईल.

बातम्या आणखी आहेत...