आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ormer CM Siddaramaiah Said Our Phones Were Hacked To Topple Karnataka Government

इंटरव्ह्यू:कर्नाटक सरकार पाडण्यासाठी आमचे फाेन हॅक, फाॅरेन्सिकला देण्यास तयार : सिद्धरामय्या

बंगळुरू / विनय माधव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायली साॅफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून भारतात पत्रकार, नेते व अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्यात आली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी व सिद्धरामय्या यांच्या खासगी सचिवांची नावेही सामील आहेत. कर्नाटकचे उभय नेते स्वीय सहायकाचा फाेन वापरतात. कुमारस्वामी व त्यांचा पक्ष जेडीएसने वादापासून दूर राहण्याचे ठरवले.

तुमच्या फाेनची हॅकिंग हाेत असल्याचे माहिते हाेते?
आपल्या फाेनची हॅकिंग हाेत आहे, हे काेणालाही ठाऊक नव्हते. भाजप फाेन टॅपिंगमध्ये सामील असल्याचा आम्हाला अंदाज हाेता.

तुमचे सरकार अस्थिर झाले. तेव्हा अनेक हालचाली दिसून आल्या?
फाेनबाबत आम्हाला काही संशयास्पद वाटले नव्हते. लपवण्यासारखे आमच्याकडे काही नव्हते. म्हणूनच आम्हाला त्याची जास्त चिंता वाटली नव्हती.

तुम्ही यादरम्यान नंबर किंवा फाेन बदलला का?
मी का बदलावा? मी काेणत्याही गाेष्टीला घाबरत नाही. मी अजूनही स्वीय सहायक व्यंकटेशचा फाेन व त्याच्या क्रमांकाचा वापर करताे.

विराेधी पक्षाला तुमची गुपिते कळली असावीत ?
अशी काही गुपिते नव्हती. ते पाेटनिवडणूक कसे जिंकू शकतात हे आता आम्हाला लक्षात आले.

फाेनच्या फाॅरेन्सिक तपासासाठी तयार आहात?
बिलकूल. न्यायालयाला तपासासाठी या फाेनची गरज वाटल्यास फाॅरेन्सिक विश्लेषणासाठी तयार आहे. आमचे राजकारण पारदर्शक आहे.

बातम्या आणखी आहेत...