आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Our Army Has To Fight With The Enemy In The Most Difficult Situation In The World, If The Army Is Not Strong Then The Enemy Will Benefit: CDS Rawat

भारत-चीन सीमावाद:आमच्या लष्कराला शत्रूसोबत जगातील सर्वात कठीण स्थितीत झगडावे लागते, लष्कर शक्तिशाली नसेल तर शत्रू फायदा घेईल : सीडीएस रावत

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एलएसीवर वाद असतानाच सीडीएसचा क्षमता वाढवण्यावर भर

देशाचे लष्कर खूप कठीण स्थितीत काम करत आहे. अनिश्चिततेच्या वातावरणात परिसरात शांतता ठेवण्यासाठी सतत आपल्या क्षमतेत वाढ करत राहावी लागेल. जर भारतीय लष्कर शक्तिशाली नसेल तर शत्रू त्याचा फायदा घेऊ शकतो, असे चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी म्हटले आहे. आपल्या लष्करी क्षमतेचा उपयोग शेजारी देश आणि ज्या देशांना त्याची गरज भासेल त्यांच्यासाठी करू शकतो, असेही जनरल रावत यांनी म्हटले आहे.

लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेजवळ सहा महिन्यांपासून चीनसोबत सुरू असलेल्या वादादरम्यान जनरल यांनी हे वक्तव्य केले आहे. हा वाद शमवण्यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र त्याबाबत ठोस यश आलेले नाही.

आमच्या लष्कराला शत्रूसोबत जगातील सर्वात कठीण स्थितीत झगडावे लागते

जनरल रावत यांनी आव्हानांचा उल्लेख करत सांगितले की, आमच्या लष्कराला जंगल, वाळवंट, पठार तसेच ६५०० मीटर उंचीवरील थंड भागाचा सामना करावा लागतो. वायुदलाला भारत- प्रशांत क्षेत्रात सर्वात मोठ्या भागाला सांभाळावे लागते. त्यानुसार तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. जगात बहुदाच असा दुसरा देश असेल ज्याला एवढ्या विषम स्थितीचा सामना करावा लागतो आणि त्यादृष्टीने स्वत:ला तयार करावे लागते.

बातम्या आणखी आहेत...