आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Out Of The List Of 226 Rich Forbes In 12 Days; More Than Half The Existing Billionaire's Wealth Declines

काेराेनामुळे कडकी:12 दिवसांत 226 श्रीमंत फोर्ब्जच्या यादीतून बाहेर; निम्म्यापेक्षा जास्त विद्यमान अब्जाधीशांची संपत्ती घटली

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी विशेष : फाेर्ब्जची यादी : जगातील २,०९५ अब्जाधीशांची संपत्ती ७०० अब्ज डाॅलरची

काेराेना प्रकाेपापासून जगातील अब्जाधीशही वाचू शकलेले नाहीत. गुरुवारी फाेर्ब्जने २०२०च्या जाहीर केलेल्या यादीनुसार १८ मार्चला या यादीला अंतिम स्वरूप देतेवेळी जगात २,०९५ अब्जाधीश हाेते. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ५८ ने कमी अाहे. १२ दिवस अगाेदर यादी तयार करतेवेळीच्या तुलनेत २२६ अब्जाधीश कमी झाले अाहेत. याचा अर्थ १२ दिवसांमध्येच २२६ अब्जाधीशांची संपत्ती इतकी घटली की त्यांना यादीतून काढता पाय घ्यावा लागला. या वेळी २,०९५ अब्जाधीशांपैकी ५१%(१,६०२) जणांची संपत्ती घटली अाहे. विद्यमान अब्जाधीशांची एकूण संपत्ती ८ ट्रिलियन डाॅलर अाहे. २०१९च्या तुलनेत ती ७०० अब्ज डाॅलरने कमी अाहे. 

1 जेफ बेजोस : संपत्तीत घट - 113 अब्ज डॉलर

तिसऱ्या वर्षी अग्रस्थानी पण संपत्तीमध्ये १८ अब्ज डाॅलरने घट.  या वर्षी पत्नी मॅकेन्झीला घटस्फोट देण्यासाठी ३६ अब्ज डॉलर्स दिले. त्यामुळे ते यादीत २२ व्या स्थानी आहेत.

2 बिल गेट्स : श्रेणी वाचली - 98 अब्ज डॉलर

मायक्राेसाॅफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स दुसऱ्या स्थानी कायम अाहेत. परंतु त्यांची संपत्ती ९६.५ अब्ज डाॅलरने वाढून ९८ अब्ज डाॅलर झालेली अाहे.

3 बर्नार्ड अर्नाल्ट : बफेटपेक्षा वर - 76 अब्ज डॉलर

गतवर्षी चाैथ्या स्थानावरचे  बर्नार्ड वाॅरेन बफेट एक पायरी वर सरकले अाहेत. संपत्ती ना वाढली ना घटली. ते पहिल्यांदाच एक पायरी वर गेले.

21 मुकेश अंबानी : संपत्तीमध्ये घट - 44.3 अब्ज डॉलर

िरलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी  गतवर्षी ५० अब्ज डाॅलरसह १३ व्या स्थानावर हाेते.  जिअाेमुळे यश मिळूनही काेराेनामुळे संपत्तीत ५.७ अब्ज डाॅलरची घट.

78 दमानी : श्रेणी-संपत्तीत वाढ - 16.4 अब्ज डॉलर

डिमार्ट अायपीअाेनंतर देशाचे रिटेल किंग अाेळखले जातात. गेल्या वर्षी ११.१ अब्ज डाॅलरसह १२२ व्या स्थानी हाेते. श्रेणी व संपत्ती दाेन्हीत वाढ झाली अाहे.

103 शिव नाडर : श्रेणी-संपत्तीत घट - 12.3 अब्ज डॉलर

यादीत तिसऱ्या क्रमांकाचे भारतीय शिव नाडर गतवर्षी १४.६ अब्ज डाॅलरच्या संपत्तीसह ८२ व्या स्थानावर हाेते. या वेळी संपत्ती घटली, श्रेणीही घसरली अाहे.

बातम्या आणखी आहेत...