आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Outbreak Of Second Wave Of Corona In JNU University Has 12 Deaths In The Last Two Months, Unofficial Figure 18

JNU कँपसमध्ये कोरोनाचा कहर:​​​​​​​यूनिव्हर्सिटीत 2 महिन्यात 12 मृत्यू, अनधिकृत आकडा 18; आतापर्यंत 200 पेक्षा जास्त जण संक्रमणाच्या विळख्यात

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि स्टाफला धोका

देशातील सर्वात प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरु यूनिव्हर्सिटी (JNU) मध्ये कोरोनाचा कहर वाढत असताना दिसत आहे. JNU प्रशासनाच्या कोविड रिस्पॉन्स टीमनुसार 10 पर्यंत दुसऱ्या लाटेत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यूनिव्हर्सिटी कँपसच्या अनधिकृत सूत्रांनुसार मृतूंचा आकडा 12 नाही तर 18 आहे. कोविड रिस्पॉन्स टीमनुसार पहिल्या लाटेमध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या लाटेमध्ेय दोन महिन्यातच 12 लोकांनी जीव गमावला आहे. आतापर्यंत संक्रमणासंबंधीत 200 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आले आहेत.

5 पासून 10 मेपर्यंत 4 लोकांचा मृत्यू
JNU प्रशासनानुसार, 10 मे रोजी स्कूल ऑफ कम्प्यूटेशन अँड एंटीग्रेटिव्ह सायंसेज डिपार्टमेंटमध्ये सिस्टम एनालिस्ट म्हणून काम करत असलेले जवळपास 40 वर्षांच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांना गंभीर परिस्थितीत बीएल कपूरर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते बरेही झाले होते. मात्र निगेटिव्ह रिपोर्ट आल्याच्या काही दिवसांनंतर त्यांना पुन्हा संक्रमण झाले. त्यांनी यामध्ये जीव गमावला. 5 पासून 10 मे दरम्यान 4 लोकांचा मृत्यू झाला.

कोरोनामुळे मरणाऱ्यांमध्ये सर्व स्टाफ मेंबर
कँपसमधून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत संक्रमणामुळे होणाऱ्या मृतांमध्ये स्टाफच्या लोकांचाच समावेश आहे. यूनिव्हर्सिटीच्या एका स्टाफने सांगितले की, दुसऱ्या लाटेमध्ेय कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या जास्तती जास्त लोकांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे.

तर कोविड रिस्पॉन्स टीमने म्हटले आहे की, JNU प्रशासन सलग दिल्ली सरकार आणि प्रशासनाच्या संपर्कात आहे. रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटरमध्ये बेड, व्हेंटिलेटर आणइ ऑक्सिजनची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जात आहे. JNU मध्ये आतापर्यंत तीन वेळा टेस्टिंग कँप लावण्यात आले आहेत. तर व्हॅक्सीनेशन कँप एकदा लावले आहे.

JNU मध्ये बिघडत असलेली परिस्थिती पाहता 18 एप्रिलला कोविड-19 रिस्पॉन्स टीम झाली होती तयार
JNU मध्ये परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून कोविड -19 रिस्पॉन्स कमिटी स्थापन करण्यात आली आहे. 9 लोकांच्या या कमिटीमध्ये रजिस्ट्रार चेअरपर्सन आहेत. या व्यतिरिक्त इतर 8 लोक आहेत. कोरोनाशी संबंधित प्रकरणांवर नजर ठेवण्यासाठी किंवा संक्रमित व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा सल्ला देण्यासाठी ही टीम तयार केली गेली आहे.

कमिटीचे मेंबर डॉ. सौरभ शर्मा सांनी सांगितले की, 'आम्ही सर्व विद्यार्थी आणि स्टाफ सलग संपर्कात आहोत. क्वारंटाइन सेंटर्स आणइ रुग्णालयात दाखल लोकांच्या परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे.'

4 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि स्टाफला धोका
सध्या JNU मध्ये 4,350 विद्यार्थी आणि स्टाफ आहेत. यामध्ये 3,000 विद्यार्थी, 1,000 स्टाफ (एडमिन, प्रोफेसर, टेक्निशियन) आणि 350 गार्ड आहेत. देशाच्या एवढ्या मोठ्या यूनिव्हर्सिटीमध्ये कोरोनाचे एवढे रुग्ण आढळल्यानंतर इतरांवरही कोरोनाचा धोका वाढत आहे.

लेफ्ट विंगच्या विद्यार्थ्यांनी स्टूडेंट्सला कॅम्पसमध्ये लवकर बोलवण्यासाठी दबाव टाकला होता
JNU प्रशासनानुसार पहिल्या लाटेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते. कारण त्यांना संक्रमण होऊ नये. मात्र लेफ्ट विंग स्टूडेंट यूनियनचे विद्यार्थी नेत्यांनी याला प्रशासनाचा कट म्हटले होते.

AISF चे विद्यार्थी नेते हरेंद्र यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सांगितले होते की, आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मिळून विद्यार्थ्यांना बोलवण्यासाठी एक प्लान बनवला होता. जेणेकरुन JNU प्रशासन सर्व विद्यार्थ्यांना बोलवू शकेल. मात्र प्रशासनाने आमचा प्लान मान्य केला नाही. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये राहावे असे प्रशासनाला वाटत नाही. विद्यार्थ्यांना कॅम्पसपासून दूर ठेवण्याचा हा प्लान आहे, यानुसारच ऑनलाइन एज्यूकेशन आणि परीक्षा होत आहेत.

कोविड रिस्पॉन्स टीमनुसार एका सदस्याने सांगितले की, काही विद्यार्थी सलग प्रशासनावर सर्व विद्यार्थ्यांना बोलवण्यावर दबाव टाकत आहेत. मात्र प्रशासनाने स्थिती पाहता सध्या जवळपास 60-65 टक्के विद्यार्थ्यांनाच बोलावले आहे.

बातम्या आणखी आहेत...