आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Outside Food Cannot Be Brought Into The Theatres; But Give Clean Water For Free: Supreme Court

कोर्ट निर्णय:सिनेगृहांत बाहेरचे पदार्थ नेता येत नाहीत; पण स्वच्छ पाणी मोफत द्या : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्ट म्हणाले, सिनेगृह हे जीम नव्हे जेथे सकस आहार घेणे गरजेचे असावे
  • फक्त लहान मुलांसाठीच खाद्यपदार्थ नेण्याची मुभा

सिनेमागृहांमध्ये बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची परवानगी देणारा जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. कोर्ट म्हणाले, सिनेमागृह जिम नाही, जिथे पौष्टिक पदार्थ असले पाहिजेत. ते करमणुकीचे ठिकाण असून खासगी मालमत्ता आहे. सिनेमागृह व्यवस्थापन बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ आतमध्ये घेऊन जाण्यापासून रोखू शकते, पण आत त्यांना स्वच्छ पाणी मोफत द्यावे लागेल. यासोबतच लहान किंवा नवजात बाळांसोबत जाणाऱ्या पालकांना पुरेशा प्रमाणात खाद्यपदार्थ आतमध्ये घेऊन जाण्यास परवानगी द्यावी लागेल.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, सिनेमागृह ही खासगी मालमत्ता आहे. याच्या मालकांना नियम-कायदे निश्चित करण्याचा अधिकार आहे. ते अशा प्रकारच्या अटी ठेवू शकतात. एखाद्याची सिनेमागृहात जिलेबी घेऊन जाण्याची इच्छा असेल तर व्यवस्थापन त्याला रोखू शकते. एखादा प्रेक्षक जिलेबी खाऊन साखरेच्या पाकाने भरलेली बोटे सीटला पुसत असेल तर खराब झालेल्या सीटचा पैसा कोण देईल? अशाच प्रकारे लोक तंदुरी चिकन किंवा इतर खाद्यपदार्थ सिनेमागृहांमध्ये घेऊ जातात. मात्र, कुणी मांसाहारी पदार्थ खाऊन हाडे तिथेच फेकली तर त्यामुळेही इतर लोकांना त्रास होईल. कोर्ट म्हणाले, प्रेक्षकांकडे सिनेमागृहांमध्ये मिळणारे पदार्थ खरेदी न करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना कोणीच पॉपकॉर्न खरेदी करण्यास भाग पाडत नाही.

सिनेमागृहात खाद्यपदार्थ खरेदी करणे सक्तीचे नाही
उल्लेखनीय म्हणजे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने प्रेक्षकांना मल्टीप्लेक्स आणि सिनेमागृहांमध्ये बाहेरचे खाद्य पदार्थ-पाणी आत घेऊन जाण्याचे आदेश दिले होते. याच्या विरोधात जम्मू-काश्मीरच्या सिनेमागृह मालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सिनेमागृह मालकांची बाजू मांडणारे वकिल म्हणाले, कुणालाही काहीही खरेदी करण्यास भाग पाडले जात नाही.

महाराष्ट्रातही मल्टिप्लेक्समध्ये बंदी कायम

मल्टिप्लेक्समधील महागडे खाद्यपदार्थ घेण्याच्या सक्तीविरोधात मुंबई हायकोर्टात जैनेंद्र बक्षी यांनी जुलै २०१८ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर बाहेरून पदार्थ नेण्यास सक्ती नसल्याचे राज्य सरकारने कोर्टात सांगितले होते. तशी सक्ती केल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. मात्र महिनाभरातच सरकारने घूमजाव करत सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरील खाद्यपदार्थ सिनेमाघरात नेण्याची बंदी कायम ठेवत असल्याचे जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...