आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Over 2,000 Deaths In A Single Day In The Country, Nearly 3 Lakh New Patients, A Record 277 Deaths In Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:देशात एकाच दिवसात 2 हजारांवर मृत्यू, नवे रुग्ण 3 लाखांजवळ, दिल्लीत विक्रमी 277 मृत्यू

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात प्रथमच कोरोनामुळे झालेल्या नव्या मृत्यूंचा आकडा २ हजारांच्याही पार गेला आहे. मंगळवारी २०१७ मृत्यू, तर २ लाख ९१,७१७ नवे रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या १ कोटी ५५ लाख ९२५१२ तर कोरोनामुक्तांची संख्या १ कोटी ३२ लाख ५०,४६९ वर पोहोचली आहे.

दिल्लीत मंगळवारी प्रथमच कोरोनाने एका दिवसात सर्वाधिक २७७ मृत्यू झाले, तर २८,३९५ नवे रुग्ण आढळले. पॉझिटिव्हिटी रेट ३२.८२% आहे. म्हणजे दिल्लीतील प्रत्येक तिसरी चाचणी पॉझिटिव्ह निघत आहे. दिल्लीतील स्थिती इतकी बिकट झाली आहे की राज्यातील रुग्णालयांत सकाळी १० वाजेपर्यंत केवळ ३० आयसीयू बेड्स उरले होते. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ९ लाख ५,५४१, तर बळींचा आकडा १२,६३८ वर पोहोचला आहे.

सर्वाधिक काेराेनाग्रस्त राज्यांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मंगळवारी राज्यात ६२ हजार ९७ नवे रुग्ण सापडले. दिवसभरात ५१९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३९ लाख ६०,३५९ वर पाेहाेचली.

बातम्या आणखी आहेत...