आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरूमध्ये अज्ञात आजाराने पीडितांची संख्या ४५० झाली आहे. यापैकी १८८ रुग्णांवर उपचार सुरू असून २६३ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आलेे. रविवारी रात्री एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या आजाराचा शोध घेण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने परिसरातील ५७,००० घरांचे सर्वेक्षण केले आहे.
दरम्यान, विविध चाचण्यांच्या सुरुवातीच्या विश्लेषणानुसार, आर्गोनोक्लोरीनसारखे कीटकनाशक या आजारांमागील कारण मानले जात आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, आर्गेनोक्लोरीनमुळे हा आजार झाल्याची शक्यता आहे. खात्री करण्यासाठी आम्ही लॅब रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहोत. दुसरीकडे, केंद्र सरकारनेही तज्ज्ञांचे एक पथक एलुरूसाठी रवाना केले आहे. पश्चिम गोदावरीचे जिल्हाधिकारी आरएम राजू यांनी सांगितले की, हा संसर्गजन्य आजार नाही. कारण यात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झालेला नाही.
पालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून हा आजार पसरला असल्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. दरम्यान, रुग्णांमध्ये मिरगीसारखी लक्षणे दिसून आली आहेत. बहुतांश लोकांनी चक्कर येणे, उलटी आणि पाठदुखीची तक्रार केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.