आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Over 50000 Kisan Leave For Delhi From Punjab Amritsar;Punjab Amritsar Farmers Agitation Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांचा जत्था अमृतसरवरुन दिल्लीकडे रवाना:दरबार साहिबमध्ये अरदास केल्यानंतर 700 ट्रॅक्टरमधून 50 हजार शेतकरी दिल्लीकडे रवाना

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांच्या 15 पैकी 12 मागण्या सरकारला मान्य

कृषी कायद्याविरोधात देशभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर पंजाब-हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी ठाण मांडले आहे. दरम्यान, शुक्रवारी 700 ट्रॅक्टरमधून 50 हजार शेतकरी अमृतसरवरुन दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यांचे म्हणने आहे की, आता केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी देशभर रेल्वे रोको केले जाईल.

शेतकरी नेत्यांनी सरकारसोबत झालेल्या बैठकीत 15 मागण्या ठेवल्या होत्या. यातील सरकारने 12 मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी म्हणत आहेत की, उर्वरित तीन मागण्या कृषी कायदा मागे घेण्याबाबत आहेत आणि त्याच सरकार मान्य करत नाहीये. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन अजून तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या समुहाचे नेतृत्व करणारे शेतकरी-मजूर संघर्ष कमेटीचे प्रमुख सरवण सिंह पंधेर म्हणाले की, आम्ही सहा महिन्यांचे राशन सोबत घेतले आहे. आता दिल्ली जिंकल्यावरच आम्ही परत येऊ.

जालंधरवरुन पुढे गेले

शुक्रवारी दुपारपर्यंत शेतकऱ्यांचा जत्था जालंधरपर्यंत आला होता. जालंधर-अमृतसर हायवेवर एका साइडला ट्रॅक्टर-ट्रॉल्यांची लाइन लागली होती. दिल्लीला जाण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी श्री हरमंदिर साहिबणध्ये अरदास केली. यानंतर गोल्डन गेटवर एकत्र आले.

कृषी मंत्र्यांची अपील मान्य नाही

10 डिसेंबरला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना अपील केली होती की, शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्यास तयार आहोत. कोरोनाचा आणि थंडीचा धोका पाहता, आम्ही शेतकऱ्यांबाबत चिंतेत आहोत. शेतकऱ्यांनी आमच्या प्रस्तावावर विचार करावा.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser