आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोराेना:देशात 60 हजारांपार नवे रुग्ण, 16 ऑक्टोबरनंतर देशात आढळलेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा; अनेक राज्यांत कडक निर्बंध लागू

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात शुक्रवारी कोराेनाचे ६०,३७६ नवे रुग्ण आढळले आहेत. हा १६ ऑक्टोबरनंतर देशात आढळलेल्या रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी देशभरात २७७ मृत्यू नोंदवण्यात आले. गुजरातेत प्रथमच २१९० नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे होळी, ईस्टर व शब-ए-बरात, ईद-उल-फित्रसारख्या सणांकडे पाहता केंद्राने राज्यांना गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध आणावेत. पंजाब सरकारने ११ जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी जारी केली आहे.

अनेक राज्यांत कडक निर्बंध लागू
- मध्य प्रदेशच्या इंदूर, भोपाळ, जबलपूर आदी शहरांत शनिवारी-रविवारी लाॅकडाऊन सुरू.
- गुजरातच्या काही शहरांत रात्रीची संचारबंदी.
- उत्तर प्रदेशमध्ये शाळा पुन्हा बंद केल्या.

बातम्या आणखी आहेत...