आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Over One Third Of Indian Households May Run Out Of Resources In Another Week: CMIE Survey

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CMIE चा सर्व्हे:लॉकडाऊनमुळे 25 टक्के लोक बेरोजगार; एका आठवड्यानेही वाढला तर देशातील एक तृतियांश जनता अक्षरशः रस्त्यावर येईल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रेनने घरी जाण्याच्या अपेक्षेने जालना रेल्वे स्टेशनवर अशी गर्दी पाहायला मिळाली. - Divya Marathi
ट्रेनने घरी जाण्याच्या अपेक्षेने जालना रेल्वे स्टेशनवर अशी गर्दी पाहायला मिळाली.
  • देशव्यापी लॉकडाउनमध्ये गेल्या 2 कोटी 70 लाख युवकांच्या नोकऱ्या

कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी सरकारने 25 मार्च पासून देशव्यापी लॉकडाउन जारी केला. त्यामध्ये सातत्याने वाढ होत गेली आणि 17 मे रोजी लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत असतानाच आता 18 मे पासून चौथ्या लॉकडाउनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केली आहे. याच दरम्यान, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE) चा एक सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार, देशातील लॉकडाउन एका आठवड्यानेही वाढल्यास एक तृतियांश भारतीय कुटुंब रस्त्यावर येतील. त्यांच्याकडे जगण्यासाठी असलेल्या जीवनावश्यक वस्तूच नसतील.

84% पेक्षा अधिक घरांच्या मासिक उत्पन्नात घट

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीने कोरोना व्हायरसमुळे लागू असलेल्या लॉकडाउनमुळे कुटुंबांच्या उत्पन्नाचा अभ्यास केला. त्यानुसार, भारतातील 84 टक्के घरांचे मासिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचे समोर आले आहे. देशात काम करणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी 25 टक्के लोकांचे रोजगार आधीच बंद झाले आहेत.

34% घरांतील परिस्थिती अतिशय वाइट

सीएमआयईचे चीफ इकोनॉमिस्ट कौशिक कृष्णन म्हणाले, "संपूर्ण देशाबद्दल बोलावयाचे झाल्यास 34 टक्के घरांतील परिस्थिती सर्वात वाइट आहे. त्यांच्याकडे एक आठवडा जगण्याइतकी सुद्धा जीवनावश्यक साहित्ये नाहीत. अशात आणखी एक आठवडा लॉकडाउन वाढल्यास ते अक्षरशः रस्त्यावर येतील. कारण, त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच राहणार नाही. समाजातील कमी उत्पन्न असलेल्या या गटातील लोकांना समाजातूनच तत्काळ मदत मिळणे आवश्यक आहे." अशा लोकांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करणे आवश्यक आहे. सरकारला सुद्धा या लोकांची मदत करावी लागेल. सरकारने त्यांना मदत केली नाही तर कुपोषण आणि दारिद्रीच्या नवीन समस्या देशात निर्माण होतील.

2 कोटी 70 लाख युवकांच्या नोकऱ्या गेल्या

सीएमआयईच्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा आकडा सातत्याने वाढत आहे. 21 मार्च रोजी बेरोजगारीचा दर 7.4 टक्के होता. हाच आकडा 5 मे पर्यंत 25.5 टक्क्यांवर गेला. सर्व्हेनुसार, देशात 20 ते 30 वर्षे वयोगटातील 2 कोटी 70 लाख पेक्षा अधिक युवकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...