आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Oxford AstraZeneca COVID 19 Vaccine Update| Oxford AstraZeneca COVID 19 Vaccine Provid Better Immune Response When Two Full Dose Regime Used.

ऑक्सफोर्डचे एका महिन्यात दुसरे निवेदन:कोवीशील्ड व्हॅक्सीनचे दोन फुल डोस प्रभावशाली; पहिल्या दोन डोसच्या परिणामांवर प्रश्न झाले होते उपस्थित

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्सफोर्डने फेज 1 ते फेज 3 चा चाचणी निकाल एका महिन्यात दुसर्‍या वेळी जाहीर केला.

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेका कंपनीच्या कोरोना व्हॅक्सीन (कोवीशील्ड) चे दोन फूल डोस चांगला इम्यून रिस्पॉन्स देत आहेत. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीने गुरुवारी रात्री ही माहिती दिली. यूनिव्हर्सिटीने एका निवेदनात सांगितले की - पहिले आम्ही एक फूल आणि एक हाफ डोस देऊन ट्रायक केली होती. म्हणजेच कँडिडेटला दिड डोसदेण्यात आले होते. आता फूल डोस देण्यात आले. याचे परिणाम खूप चांगले आले आहेत.

जवळपास एक महिन्यापूर्वी एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्डने व्हॅक्सीनमध्ये मॅन्यूफॅक्चरिंग एरर असल्याचे मान्य केले होते. तेव्हा व्हॅक्सीनच्या तिसऱ्या फेजच्या ट्रायलचे परिणाम जारी करण्यात आले होते, ज्यामध्ये वेगवेगळे परिणाम समोर आले होते.

दोन फूल डोज आवश्यक
गुरुवारी जाहीर केलेल्या निवेदनात, ऑक्सफोर्डने आपल्या लसीविषयी ताजी माहिती दिली. म्हणाले- आम्ही आमच्या कँडिडेट्सला चाचणी दरम्यान लसीचे दोन पूर्ण डोस दिले. याचा चांगला परिणाम समोर आला. यापूर्वी आम्ही एक फूल डोस आणि एक हाफ डोज दिला होता. त्या तुलनेत, दोन पूर्ण डोस खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.

आता कंपनीचे नवीन निवेदन आले आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीने वेगवेगळे रिजल्ट आल्याची गोष्ट मान्य केली होती. त्यानंतर तज्ञांनी त्याच्या डेटा विश्लेषणावर देखील प्रश्न केला होता. नवीन निवेदनात, ऑक्सफोर्डने कबूल केले आहे की लसीच्या निकालांची पुष्टी करण्यासाठी अधिक काम करणे आवश्यक आहे.

तीन टप्प्यांचा तपशील जाहीर
ऑक्सफोर्डने फेज 1 ते फेज 3 चा चाचणी निकाल एका महिन्यात दुसर्‍या वेळी जाहीर केला. परंतु, पहिल्या दीड डोसचा संदर्भ त्यात देण्यात आलेला नाही. विद्यापीठाचे म्हणणे आहे की दीड डोस देण्याच्या चाचण्या पूर्व-ठरवल्या नव्हत्या. आता ऑक्सफोर्डचा जोर फक्त त्याच्या लसीचे पूर्ण दोन डोज देण्यावर आहे. ते म्हणतात की दीड आणि दोन डोस वापरणे हे त्याच्या रणनीतीचा एक भाग होता. यावर पूर्वीच प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, कारण डोसमधील फरकांमुळे निकालातील फरक देखील स्वाभाविक आहे.

ऑक्सफोर्डने म्हटले - बूस्टर डोज दिल्यानंतर जे परिणाम आले त्यावरुन स्पष्ट झाले की, सिंगल डोजच्या तुलनेत अँटीबॉडी लवकर तयार होतात. स्टँडर्ड डोजचाच वापर केला गेला पाहिजे.

यामुळे पहिले उपस्थित झाले होते प्रश्नचिन्ह
ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेका ने 23 नोव्हेंबरला वक्तव्य जारी करत सांगितले होते की, यूके आणि ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या परीक्षणांमध्ये व्हॅक्सीन (AZD1222) खूप प्रभावी असल्याचे समोर आले. आधी डोज दिल्यावर व्हॅक्सिन 90% इफेक्टिव्ह असल्याचे दिसले. यानंतर दूसऱ्या महिन्यात फूल डोज दिल्यानंतर 62% प्रभावी दिसली. एक महिन्यानंतर दोन फूल डोज दिल्यानंतर व्हॅक्सिनचा प्रभाव 70% दिसला. भरतात ही व्हॅक्सीन पुणे येथील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होत आहे.

बातम्या आणखी आहेत...