आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटनने ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाकडून डेव्हलप करण्यात आलेली कोरोना व्हॅक्सीन-कोवीशील्डला एमरजेंसी अप्रूव्हल दिले आहे. पुढच्या आठवड्यापासून ही व्हॅक्सीनही भारताच्या व्हॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये सामिल होईल. हे भारतासाठी चांगले वृत्त आहे. कारण यामुळे अदार पूनावाला यांच्या पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) ला लवकरच कोवीशील्डसाठी इमरजेंसी अप्रूव्हल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत केवळ फायजर-बायोएनटेकच्या व्हॅक्सीनला अप्रुव्हल मिळाले होते. सरकारी डेटानुसार आतापर्यंत जवळपास सहा लाख लोकांना व्हॅक्सीनेट करण्यात आले आहे. एस्ट्राजेनेकाने एका निवेदनात दावा केला आहे की, व्हॅक्सीनचा पहिला डोज बुधवारी रिलीज होईल. व्हॅक्सिनेशन नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू केला जाऊ शकेल. यामध्ये म्हटले आहे की, कंपनीची ब्रिटन सरकारला 10 कोटी डोज सप्लाय करण्याची डील आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात मान्यता मिळणे अपेक्षित
SII ने स्वतः कॉव्हशील्डसाठी औषध नियामकांकडून तातडीची मंजुरी मागितली आहे. गेल्या आठवड्यात, विषय तज्ज्ञ समितीने सांगितले की यूकेमध्ये मान्यता मिळाल्यानंतरच या लसीचा विचार केला जाईल. यासंदर्भात समितीने SII कडे काही डेटा मागविला होता, जो गेल्या आठवड्यात सादर करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी अदार पूनावाला म्हणाले होते की, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही लस मंजूर होण्याची अपेक्षा आहे.
50-60 लाख डोस तयार आहेत
कंपनीने आपल्या रिस्कवर सुमारे सहा कोटी डोस तयार केल्याचेही पूनावाला म्हणाले. 10 कोटी लस डोस फेब्रुवारी पर्यंत तयार केले जातील. आपत्कालीन मंजुरी मिळताच लसीचे वितरण सुरू होईल. सरकारला 250 रुपये आणि सामान्य भारतीयांना 500 रुपयांमध्ये लसचा एक डोस मिळेल.
कोविशिल्टचे निकाल कसे मिळाले?
अएस्ट्राजेनेकाने 23 नोव्हेंबर रोजी याच्या फेज -3 क्लिनिकल चाचण्यांचे निकाल जाहीर केले. त्यानुसार, जेव्हा एक हाफ आणि एक फूल डोज दिला तेव्हा 90% प्रभावी झाली. तस दोन फूल डोज दिल्यावर 62% टक्के प्रभावी राहिली. SII ने या लसीचे डोस तयार करण्यासाठी करार केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.