आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Oxford's Corona Vaccine Safe, Trials Resume; Investigations To Date Have Found The AstraZeneca Vaccine Safe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सिन:ऑक्सफर्डची कोरोना लस सुरक्षित, चाचण्या पुन्हा सुरू; आजवरच्या तपासात अॅस्ट्राझेनेकाची लस आढळली सुरक्षित

लंडन/नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • भारतातील कोव्हॅक्सिन लसीच्या प्राण्यांवरील चाचण्याही यशस्वी

ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत कोरोना लस तयार करणाऱ्या अॅस्ट्राझेनेकाने लसीच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या पुन्हा सुरू केल्या आहेत. अॅस्ट्राझेनेकाने म्हटले की, ब्रिटनच्या मेडिसिन्स हेल्थ रेग्युलेटरी अॅथॉरिटीला तपासाअंती लस सुरक्षित असल्याचे आढळले आहे. यानंतर लसीच्या क्लिनिकल ट्रायलला हिरवी झेंडी देण्यात आली आहे

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात यश मिळाल्यानंतर लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू होत्या. मात्र एका स्वयंसेवकाची प्रकृती बिघडल्यानंतर त्या थांबवल्या होत्या. दरम्यान, भारतात सीरम इन्स्टिट्यूटला या लसीच्या चाचण्या पुन्हा देण्याच्या मंजुरीबाबत केंद्राच्या संबंधित संस्थेची सोमवारी बैठक होण्याची शक्यता आहे.

भारतातील कोव्हॅक्सिन लसीच्या प्राण्यांवरील चाचण्याही यशस्वी

भारतात इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चसोबत (आयसीएमआर) “कोव्हॅक्सिन’ ही लस तयार करत असलेल्या भारत बायोटेकने म्हटले आहे की, लसीच्या सर्व १२ विभागांत चाचण्या करण्यात आल्या. कंपनीच्या ताज्या अहवालानुसार, “निकालांच्या लाइव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये लसीची सुरक्षा प्रभावशाली राहिल्याचा दावा करण्यात आला आहे.’ कंपनीने म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन दिल्यामुळे माकडांत विषाणूरोधक अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत. इनअॅक्टिव्हेटेड कोरोना व्हायरसचे दोन डोस २० प्राण्यांना देण्यात आले होते. त्यांचे चार समूहांत वर्गीकरण करण्यात आले हाेतेे.