आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:ऑक्सिजन 47% महागला, निर्णय 6 महिने लागू राहणार, कोरोना संकट काळात सरकारचा निर्णय

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे रुग्णालयांत ऑक्सिजनचा खप तब्बल चारपटीने वाढला आहे

गंभीर कोरोना रुग्णांना औषधांपेक्षा ऑक्सिजनची अधिक गरज भासू लागली आहे. त्यामुळे देशात मार्चनंतर ऑक्सिजनचा खप चौपट वाढला. दरम्यान, ऑक्सिजन उत्पादकांच्या मागणीवरून केंद्राने ऑक्सिजनचे दर ४७% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सहा महिने लागू राहील. रुग्णालयांत वापरला जाणारा ऑक्सिजन आतापर्यंत १७.४९ रुपये प्रति घनमीटर या भावाने मिळत होता. आता तो २५.७१ रुपयांना मिळेल. यात वाहतुकीचा खर्च समाविष्ट नसेल. िशवाय, यावर १२% जीएसटी असेल. यात उत्पादक छोट्या उद्योजकांना कोणत्या दराने ऑक्सिजन विकेल हे आतापर्यंत निश्चित नव्हते. मात्र, उद्योजक काय भावाने विकेल हे ठरलेले होते. आता उत्पादकांसाठीही दर निश्चित करण्यात आले आहेत.

मागणी अधिक वाढल्याने काळाबाजारही वाढला
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, काही राज्य सरकारांनी आपल्या पातळीवर ऑक्सिजन दर वाढवला होता. असे असूनही उत्पादकांकडून घेऊन किरकोळ विक्रेते मूळ किमतीपेक्षा अधिक रक्कम वसूल करत होते. या काळ्याबाजारात १५० रुपये घनमीटर दराने ऑक्सिजन विकला जात होता. यामुळे सरकारने दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनुसार, भारतात कोरोना काळापूर्वी रोज ७५० मे. टन इतका ऑक्सिजनचा खप होता. तो आता २८०० मे. टन झाला आहे. रसायन व खत मंत्रालयानुसार, सध्या भारतात रोज ६५०० मे. टन ऑक्सिजन उत्पादन होत आहे. यातील बहुतांश ऑक्सिजनची निर्मिती भारतातच होत आहे. या काळात ऑक्सिजनची आयात जवळपास बंदच आहे. ऑक्सिजन आयात करण्याची गरज पडणार नाही, असे सरकारला वाटते.

बातम्या आणखी आहेत...