आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Oxygen Bubble Will Double Capacity: IIT Plant Machine Will Increase Oxygen In Water, Convert Leftover Milk From Cream Into Energy Drink

दिव्य मराठी विशेष:ऑक्सिजन बबल करेल क्षमता दुप्पट : आयआयटी रोपडचे यंत्र पाण्यातील ऑक्सिजन वाढवेल, क्रीममधून उरलेल्या दुधाचे एनर्जी ड्रिंकमध्ये रूपांतर

रोपड | संदीप वशिष्ट12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयआयटी रोपडने नॅनो बबल जनरेटर नावाने असे मल्टिपर्पज मशीन बनवले जे शेती, ऑक्सिजन तुटवड्याचा सामना करणारे आणि एनर्जी ड्रिंक आवडणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. ८० ते ९० हजार किमतीचे हे मशीन लवकरच बाजारात उपलब्ध होईल. आयआयटीचा दावा आहे की, ऑक्सिजनचे प्रमाण वाढवल्याने अनेक अडचणी सुटतील. या मशीनद्वारे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवले जाऊ शकते. हे पाणी गिर्यारोहक आणि उंच ठिकाणांवर प्रवास करणाऱ्यांना ऑक्सिजन कमी पडू देणार नाही. दुधातील क्रीम काढल्यानंतर उर्वरित स्प्रेटामध्ये ऑक्सिजन वाढवून ते एनर्जी ड्रिंकमध्ये बदलते. जिम जाणाऱ्यांसाठीही हे स्वस्त चांगल्या एनर्जी ड्रिंकचा पर्याय ठरेल. फिश फार्मिंगमध्ये माशांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासह ते पशूंच्या जखमा बऱ्या करण्यासही मदत करते.

मशीनपासून बनणाऱ्या ओझोन सोल्युशनने मरतात जिवाणू

नॅनो बबल जनरेटर बनवणारे डॉ. नीळकंठ म्हणाले की, हे यंत्र बनवण्यास तीन वर्षे लागली. यावर २०१८ मध्ये काम सुरू केले होते. २०२१ मध्ये ते तयार झाले. ते नंतर प्रोजेक्टमध्ये सहभागी केले. त्यांनी सांगितले की, या मशीनमधील कॉन्संट्रेटर आयआयटीत बनवले आहे. त्यासोबतच नॅनो बबल जनरेटर आणि ओझोन सोल्युशन आहे. ओझोन सोल्युशनमुळे बॅक्टेरिया मरतात आणि नॅनो बबल असेपर्यंत पुन्हा तयार होत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. हेे नॅनो बबल डोक्याच्या केसापेक्षा ९० हजार पटीने लहान असतात. १ मिली पाण्यात १ बिलियन नॅनो बबल बनतील.

दावा-हे देशातील पहिले मशीन, ज्याचे अनेक फायदे
आयआयटीच्या टीमचे म्हणणे आहे की, ही देशातील असे पहिले मशीन आहे, ज्याचे एकाच वेळी अनेक फायदे आहेत. भारत सरकारने डिसेंबर २०२० मध्ये २५ प्रोजेक्टपैकी शेतीचा प्रोजेक्ट आयआयटी रोपडला दिला होता.

जखम होईल लवकर बरी
डेअरी व्यवसायात क्रिम काढल्यानंतर जे दूध उरते, त्यात जर ४००% अधिक ऑक्सीजनसह काही प्रथिने मिसळली तर ते जिम जाणारे लोक तसेच बॉडी बिल्डर्ससाठी एनर्जी ड्रिंकचे काम करेल. जर पाण्यात ४००% जास्त ऑक्सिजन टाकून प्यायल्यास रुग्ण, गिर्यारोहक व डोंगरावर राहणाऱ्या लोकांना ज्यांना जास्त ऑक्सिजन हवे, त्यांना ऑक्सिजन मिळू शकेल. पशूंच्या जखमा ४००% अधिक ऑक्सिजनद्वारे स्वच्छ केल्या तर त्या लवकर बऱ्या होतील.

बातम्या आणखी आहेत...