आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Oxygen Can Now Be Released Directly Into The Blood Vessels, Eliminating The Need For A Ventilator

दिव्‍य मराठी विशेष:आता थेट रक्तवाहिन्यांमध्ये आॅक्सिजन सोडता येणार, व्हेंटिलेटरवरील अवलंबित्व संपणार

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडसह इतर काही आजारांमध्ये फुप्फुसांना अतिरिक्त प्राणवायूची गरज भासते. परंतु त्यासाठी फुप्फुसांना संघर्ष करावा लागताे. गंभीर प्रकरणांत रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्यास अनेक वेळा रुग्णाला ही जीवनरक्षक प्रणाली गरजेच्या वेळी उपलब्ध होत नाही. आता संशाेधकांनी शरीराच्या गरजेच्या वेळी योग्य आॅक्सिजनचा पुरवठा करणारे तंत्र शाेधून काढल्याचा दावा केला आहे. या पद्धतीमुळे व्हेंटिलेटरवरील अवलंबित्व जवळपास नगण्य होईल. पारंपरिक मेकॅनिकल व्हेंटिलेशन व एक्स्ट्राकोर्पाेरियल मेम्ब्रेन आॅक्सिजनेशन (एक्मो) नावाच्या एका तंत्रज्ञानाच्या साह्याने रक्त शरीराबाहेर काढता येते. त्यानंतर आॅक्सिजन रक्तात मिसळवता येतो. परंतु नव्या तंत्रामुळे आॅक्सिजन थेट रक्तात मिसळवता येऊ शकतो. त्यामुळे रुग्णाचे रक्त आहे त्या ठिकाणी ठेवता येते. आॅक्सिजनचा तरल पदार्थ रक्तात मिसळवला जाताे. इंजेक्शनद्वारे हे करता येते. नंतर ते बुडबड्यासारखा आकार घेते. ते रक्तपेशींहून सूक्ष्म असते. म्हणजेच सलाइनच्या साह्याने रक्तवाहिन्यांत विनाअडथळा ते प्रवाहित होऊन सर्व नसांपर्यंत पाेहोचवले जाते. या तंत्राद्वारे आॅक्सिजन दिलेल्या रुग्णांत खूप चांगले परिणाम दिसून आले. त्यांची आॅक्सिजन पातळी काही मिनिटांत १५ टक्क्यांहून ९५ टक्के झाली.

लिपिड मेम्ब्रेन कोटिंग केले जाते
रक्तात मिसळण्याच्या आधी या बुडबुड्यांवर लिपिड मेब्रेन कोटिंग केले जाते. या आवरणामुळे विषाक्तता रोखली जाते. त्याचबरोबर बुडबुड्यांना एकत्र येण्यास रोखते. सोल्युशन नसांमध्ये इंजेक्ट झाल्यानंतर आवरण वितळते आणि आॅक्सिजन रक्तात सहजपणे मिसळते.

बातम्या आणखी आहेत...