आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूस जबाबदार कोण?:अँब्युलन्समधील ऑक्सिजन संपला, 2 महिन्याच्या चिमुकलीने आईच्या कुशीतच घेतला अखेरचा श्वास

गुनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

108  अँब्युलन्सने रेफर केलेल्या चिमुकलीचा ग्वालियरला पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला. तिला निमोनिया आणि ह्रदयासंबंधी त्रास होता. तिला गुनाच्या जिल्हा रुग्णालयातून मंगळवारी संध्याकाळी ग्वालियरच्या रुग्णालयात रेफर केले होते. परंतू, 35 किलोमीटर दूर म्यानाजवळ जात असताना, अँब्यूलन्समधील ऑक्सिजन संपला. दरम्यान, दुसरी गाडी येईपर्यंत या चिमुकलीने आपल्या आईच्या कुशीत शेवटचा श्वास घेतला. असंवेदनशीलतेने तेव्हा मर्यादा ओलांडली, जेव्हा प्रकरण दाबण्यासाठी अँब्युलन्सच्या ड्रायव्हरने मृत बाळाला ऑक्सिजन लावून शिवपुरीला आणले. 

मृत मुलीचे वडील सांगतात की, शिवपुरी येथे आम्ही आमच्या 2 महिन्यांच्या मुलीच्या मृतदेहासह इकडे-तिकडे फिरलो, पण कोणीही ऐकले नाही. आम्हाला गुनाला परत येण्यासाठी कोणतेही वाहन दिले गेले नाही. जबरदस्तीने कर्ज घेऊन खासगी कार किरायाने घेत आम्हाला घरी यावे लागले. याप्रकरणी सीएमएचओ पीय बुनकर म्हणाले की, फिर्यादीचा जबाब नोंदवून कारवाई केली जाईल. 

रेफर केल्याच्या 5 तासानंतर मिळाली अँब्युलन्स

आरोनच्या गुलाबगंजचे रहिवासी अनिल वंशकार यांची दोन महिन्यांची मुलगी कनकची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे तिला सोमवारी रात्री तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासादरम्यान बाळ रोग तज्ज्ञांनी तिला निमोनिया आणि हार्टसंबंधी आजार असल्याचे सांगितले. त्यानंतर मंगळवारी दुपारील तिला 1 वाजता ग्वालियर रेफर करण्यात आले होते. परंतू, अँब्यूलन्स संध्याकाळी 6 वाजता आली.

व्यवस्थेवर प्रश्न

मुलीला ज्या 108 अँब्यूलन्सने ग्वालियरला घेऊन जात होते, म्यानाकडे निघाल्यानंतर यातील ऑक्सीजन संपली. प्रश्न हा आहे की, अँब्यूलन्समध्ये 14 किलो आक्सीजन असते, जी 200 किमीच्या प्रवासात कसकाय संपले? यावर जिगित्सा हेल्थ केअरचे समन्वयक गिर्रराज तोमर म्हणाले की, तांत्रिक बिघाडामुळे असे झाले. परंतू, कोणता तांत्रिक बिघाड झाला, हे सांगितले नाही.

आई-वडिलांना किरायाची गाडी करुन घरी यावे लागले

मुलीचे वडील अनिल वंशकार यांचे म्हणने आहे की, त्यांची दोन महिन्यांची मुलगी म्यानाजवळ ऑक्सीजन न मिळाल्यामुळे मृत झाली होती. परंतू, ड्रायव्हरने आम्हाला बळजबरी शिवपुरीला आणले. तेथून परत गुनाला येण्यासाठी अनेकांसमोर हात जोडले, पण कोणीच ऐकले नाही. त्यानंतर एका खासगी वाहन चालकाने आमची परिस्थिती पाहून 3 हजार रुपये घेऊन आम्हाला घरी सोडले.

बातम्या आणखी आहेत...