आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्सिजनच्या तुटवड्यावर सुप्रीम कोर्ट कठोर:पुरवठ्यासाठी नेमला टास्क फोर्स, पुरवठ्याची कार्यप्रणाली निश्चित करण्याची असेल जबाबदारी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृतिदलाचे कार्य : ऑक्सिजनची गरज, उपलब्धता व वितरणाच्या आधारे देशभरासाठी शिफारस

राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजनचा शास्त्रीय आधारावर पुरवठा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एका कृतिदलाची (टास्क फोर्स) स्थापना केली आहे. हे कृतिदल ऑक्सिजन वितरणाची एक निश्चित कार्यप्रणाली तयार करेल. संपूर्ण देशातील ऑक्सिजनची गरज, त्याची उपलब्धता आणि वितरण या आधारावर मूल्यांकन करून कार्यप्रणाली निश्चित केली जाईल.

न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने ६ मे रोजी अशा कृतिदलाच्या स्थापनेसंबंधी आदेश दिला होता. हा आदेश सुप्रीम कोर्टाने शनिवारी वेबसाइटवर अपलोड केला. केंद्र सरकारमधील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी समन्वय राखून हे कृतिदल काम करेल. केंद्रीय कॅबिनेट सचिव त्याचे संयोजक व पदसिद्ध सदस्य असतील. आपल्या मदतीसाठी हे सचिव विविध भागांतून एक किंवा अधिक उपगट स्थापन करू शकतील.

हे आहेत कृतिदलाचे सदस्य : डॉ. भबतोष विश्वास, माजी कुलगुरू, प. बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कोलकाता, डॉ. देवेंद्रसिंह राणा, अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, सर गंगाराम रुग्णालय, नवी दिल्ली, डॉ. देवीप्रसाद शेट्टी, अध्यक्ष व कार्यकारी संचालक, नारायण हेल्थकेअर, बंगळुरू, डॉ. गगनदीप कांग, प्रोफेसर, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू, डॉ. जे. व्ही. पीटर, संचालक, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू, डॉ. नरेश त्रेहान, अध्यक्ष व महासंचालक, मेदांता रुग्णालय, गुरुग्राम, डॉ. राहुल पंडित, संचालक, क्रिटिकल केअर मेडिसिन व आयसीयू, फोर्टिस रुग्णालय, मुलुंड (मुंबई) आणि कल्याण, डॉ. सौमित्र रावत, अध्यक्ष व प्रमुख, सर्जिकल गॅस्ट्रोएंटरॉलॉजी आणि लिव्हर प्रत्यारोपण विभाग, सर गंगाराम रुग्णालय, दिल्ली, डाॅ. शिवकुमार सरीन, वरिष्ठ प्राेफेसर, संचालक, इन्स्टिट्यूट अाॅफ लिव्हर अँड बिलियरी सायन्स, दिल्ली, डॉ. जरीर एफ. उदवाडिया, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, हिंदुजा रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय आणि पारसी हॉस्पिटल, मुंबई, सचिव, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय. (स्थायी सदस्य), केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव कृतिदलाचे संयोजक आणि सदस्य असतील.

कृतिदलाचे कार्य : ऑक्सिजनची गरज, उपलब्धता व वितरणाच्या आधारे देशभरासाठी शिफारस

ऑक्सिजनची गरज, उपलब्धता व वितरणाच्या आधारे देशभरासाठी कृतिदल शिफारस करेल. { शास्त्रीय, तर्कसंगत, न्यायसंगत आधारावर राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजन पुरवठ्याची कार्यप्रणाली निश्चित करेल. { या महामारीत मागणीच्या आधारे ऑक्सिजनची उपलब्धता व पुरवठा वाढवण्यासंबंधी शिफारशी करेल. { आवश्यक औषधांची उपलब्धता निश्चित करून उपाय सुचवेल. { सध्याच्या परिस्थितीत निर्माण होत असलेल्या आव्हानांचा अगोदरच अंदाज घेऊन त्यासंबंधी निर्णय घेईल.{ ग्रामीण भागांत तज्ज्ञ डॉक्टरांची मदत व्हावी म्हणून तंत्रज्ञानाचा वापर होईल, यासाठी मदत करणे. { प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेसाठी उपाय सुचवणे. { महामारी व्यवस्थापनासाठी आणि उपचारांसाठी देशभर यासंबंधीचे ज्ञान वाढवणे. दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठी सहकार्य वाढवण्यावर भर.

कृतिदल सहा महिन्यांसाठी, या काळात शिफारशी करेल

या कृतिदलाची स्थापना सहा महिन्यांसाठीच करण्यात आली आहे. या काळात अहवाल व शिफारशी हे कृतिदल देईल. सुप्रीम कोर्टानुसार, केंद्रीय स्रोतांच्या वापरासंबंधी माहिती घेण्याचा या कृतिदलास अधिकार असेल. केंद्र सरकारच्या नीती आयोग, आरोग्य मंत्रालय, लोकसंख्या विभाग, मनुष्यबळ विकास मंत्रालय, उद्योग मंत्रालय अशा महत्त्वाच्या विभागांचे सचिव या कृतिदलास याकामी मदत करतील.

राष्ट्रीय कृतिदलामुळे हे होतील फायदे

सध्याच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी निर्णय घेणाऱ्यांना माहिती मिळण्यास मदत होईल. { भविष्यातील गरजा लक्षात घेऊन त्याचे नियोजन सध्याच्या शास्त्रीय तथ्यांवर आधारित करता येईल. { सध्याच्या तसेच भविष्यातील पारदर्शक आणि व्यावसायिक आधारावर महामारीतील आव्हाने पेलण्यासाठी माहिती तसेच धोरणात्मक सल्ला मिळू शकेल.

ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंबंधी सुनावणीत दिले होते आदेश
कोरोनाकाळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यावर केंद्राकडून काही विशिष्ट राज्यांना केल्या जात असलेल्या पुरवठ्यासंबंधी दाखल याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने यासाठी विशेष कृतिदल स्थापन करण्यात यावा, असे आदेश दिले होते.

मुलांचे कोरोनापासून संरक्षण, कल्याणासाठी पावले उचला
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुलांची देखभाल, त्यांचे संरक्षण व कल्याणासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती व युवा न्याय समितीचे अध्यक्ष एस. रवींद्र भट यांनी शनिवारी सांगितले. यासंबंधी आयोजित एका बैठकीत ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...