आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Oxygen Updates: 25 Patients Die At Sir Gangaram Hospital In Delhi And 5 Die In Jabalpudue To Lack Of Oxygen; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीझन राजकारणाचा:ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात 25, जबलपूरमध्ये 5 रुग्णांचा मृत्यू... पण सरकारे परस्परांवर आरोप करण्यातच व्यग्र

नवी दिल्ली/जबलपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टरलाइट प्रकल्पात ऑक्सिजनच्या उत्पादनावर तामिळनाडूची भूमिका-आमच्याकडे सरप्लस...कोर्ट म्हणाले-इतरांसाठी तयार करा

देशात ऑक्सिजनच्या पुरवठ्याची स्थिती बिघडलेली असतानाच गुरुवारी रात्री उशिरा सर गंगाराम रुग्णालय या दिल्लीतील सर्वात मोठ्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे २५ रुग्णांचा मृत्यू झाला. अशीच स्थिती जबलपूरच्या गॅलक्सी रुग्णालयातही निर्माण झाली. तेथे ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आल्याने ५ गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. आमच्याकडे काही तासांचाच ऑक्सिजन शिल्लक आहे, असे सर गंगाराम रुग्णालयाने गुरुवारीच स्पष्ट केले होते. गुरुवारी रात्री रुग्णालयाला ऑक्सिजन तर मिळाला, पण तोपर्यंत रुग्णांची स्थिती जास्त गंभीर झाली होती. या मृत्यूनंतरही देशात ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये ताळमेळ झाला नाही.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि १० सर्वात संक्रमित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमधील उच्चस्तरीय बैठक राजकारणापासून अलिप्त राहिली नाही. ऑनलाइन बैठकीस उपस्थित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीचे थेट प्रक्षेपण केले. केजरीवाल यांना मध्येच रोखत मोदी म्हणाले,‘एखाद्या मुख्यमंत्र्याने अशा इनहाऊस बैठकीचे थेट प्रक्षेपण करणे परंपरा आणि प्रोटोकॉल यांच्या विरोधात आहे. हे योग्य नाही. आपण नेहमी संयम बाळगला पाहिजे.’ त्यावर केजरीवाल म्हणाले,‘ होय सर, ही गोष्ट लक्षात ठेवू. माफी मागतो.’ नंतर केंद्र सरकारतर्फे जारी निवेदनात म्हटले आहे की, बैठकीत राज्याचा कृती आराखडा सांगण्याऐवजी केजरीवाल यांनी त्याला राजकारणाचा आखाडा बनवला. त्याच्या उत्तरात ‘आप’ने म्हटले की, मोदी फक्त ऑनलाइन बैठकीत मास्क घालतात, प्रचारसभांत नाही.

ऑक्सिजनसाठी साडेचार तास ऑटोरिक्षाने ३ रुग्णालयांत पतीची भटकंती; पत्नीने ऑक्सिजन टँकसमोरच सोडला प्राण हे छायाचित्र अहमदाबादचे आहे. पत्नीला श्वास घेता येत नव्हता. ऑक्सिजनची तत्काळ गरज होती. पती साडेचार तास रिक्षाने अनेक ठिकाणी फिरत होता. तीन रुग्णालयांनी परत पाठवले. अखेर सिव्हिल हॉस्पिटलच्या दारात तीन रुग्णवाहिका आणि २० हजार लिटरच्या ऑक्सिजन टँकसमोर व्हीलचेअरवरच पत्नीने प्राण सोडला.

राज्यांनी ऑक्सिजनसाठी उच्चस्तरीय समित्या स्थापन कराव्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी १० सर्वात संक्रमित राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशातील मोठ्या ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. मोदी म्हणाले, मेडिकल ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या टँकरला कोणत्याही राज्याने अडवू नये. मोदींनी राज्यांना ऑक्सिजन घेऊन जाण्यासाठी उच्चस्तरीय समन्वय समित्यांची स्थापना करण्याचे आवाहन केले. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लसीच्या किमतीचा मुद्दाही मांडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेमडेसिविरच्या आयातीसाठी परवानगी मागितली.

...आणि येथे उत्पादनातच सरकारी अडथळा
तामिळनाडूतील स्टरलाइट प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवर राज्य सरकारने पुन्हा आक्षेप घेतला आहे. कंपनीने प्रकल्प सुरू केला तर लोक हिंसाचार करतील, असे सरकारचे म्हणणे आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले की, जर तुम्हाला वेदांता कंपनीबाबत समस्या असेल तर तुम्ही स्वत: ऑक्सिजनचे उत्पादन करा आणि इतर राज्यांनाही द्या.

रेल्वे आणि विमानानेही ऑक्सिजनची वाहतूक
हवाई दल आणि रेल्वेनेही ऑक्सिजनची वाहतूक सुरू केली. हवाई दलाच्या विमानांद्वारे गॅस टँकर एअरलिफ्ट केले जात आहेत. रेल्वेनेही ओडिशा आणि झारखंडहून दिल्ली, यूपी आणि इतर राज्यांसाठी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...