आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Oxygen Updates: Tamil Nadu Increase In Oxygen Storage Capacity; Kerala Sanjeevani From The Waste Of Two Gases; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्राणवायू:तामिळनाडू - ऑक्सिजन साठवण क्षमतेत वाढ; केरळ - दोन वायूंच्या टाकाऊतून संजीवनी

चेन्नई/तिरुवनंतपुरम21 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • पूर्वी क्षमता 240 मेट्रिक टन, वाढवून आता प्रतिदिवशी 1200 मेट्रिक टन

कोरोनामुळे देशात अलीकडे ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ही संजीवनी मिळत नसल्याने प्राण गमवावे लागत आहेत. परंतु तामिळनाडू, केरळने सर्व आव्हानानंतरही परिस्थिती बिघडू दिली नाही. त्याबद्दल जाणून घेऊया-

तामिळनाडूने मेडिकल आॅक्सिजनवर गेल्या वर्षीपासून काम सुरू केले हाेते. राज्यात आॅक्सिजनची दरराेजची ४०० मेट्रिक टन एवढी उत्पादन क्षमता आहे. हे उत्पादन बहुतांश खासगी कंपन्या करतात. राज्यात दरराेज आॅक्सिजनची मागणी २४० मेट्रिक टन आहे. त्यासाठी साठवण क्षमतेत वाढ करून ती प्रति दिवशी १२०० मेट्रिक टन करण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी साठवणीची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरात आॅक्सिजन साठवण व्यवस्था ३४६ मेट्रिक टनहून ८८२ मेट्रिक टन करण्यात आली. याबराेबरच राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांतील रुग्णालयांतही आॅक्सिजनची साठवण क्षमता वाढवण्यात आली.

राज्याचे आराेग्य सचिव जे. राधानकृष्णन म्हणाले, आम्ही महामारीच्या पीकचे विश्लेषण करून या गाेष्टी केल्या. आॅक्सिजनची निगराणी चाेवीस तास करावी लागते. तामिळनाडू शेजारी राज्यातही आॅक्सिजनचा पुरवठा करत आहे. आराेग्य विभागाच्या सूत्रानुसार राज्यात महामारीमुळे आता दरराेज सुमारे ४५० मेट्रिक टनची मागणी असू शकते. अशी परिस्थितीत आॅक्सिजन साठवण यंत्रणा कमी पडू शकते. म्हणून ही क्षमता पुन्हा वाढवण्याची तयारी केली जात आहे.

 • आयनाॅक्स कंपनी दरराेज ५५ ते ६० मेट्रिक टन आॅक्सिजन तामिळनाडूला पुरवठा करते.
 • पुद्दुचेरीत एक कंपनी १५० मेट्रिक टन उत्पादन करते. हे आणीबाणीसाठी राखीव आहे.
 • तेलंगणाला १० व आंध्र प्रदेशला ७० मेट्रिक टन आॅक्सिजनचा पुरवठा हाेताेय.
 • राज्यांतील कंपन्यांव्यतिरिक्त केरळहूनदेखील तामिळनाडू आॅक्सिजन मागवताे.

राज्यातील एक अधिकारी म्हणाले, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आॅक्सिजन प्रकल्प सुरू करणे शक्य नाही. म्हणूनच आम्ही साठवणीवर लक्ष केंद्रित केले. ही क्षमता कितीही वाढवता येऊ शकते.

केरळ : मागील पीकमधून धडा, आैद्याेगिक उत्पादनाचा मेडिकल उपयाेग केला
महामारी सुरू झाली हाेती तेव्हा केरळ मेटल्स अँड मिनरल्सने उद्याेगांतून निघणाऱ्या वायूंच्या टाकाऊतून आॅक्सिजनचे उत्पादन करण्यास सुरूवात केली हाेती. हा प्रकल्प अपशिष्टातून आॅक्सिजन, नायट्राेजन विलग करताे. त्यामुळे केरळ मेडिकल आॅक्सिजनच्या बाबतीत अधिक सरस राज्य आहे. गाेवा, कर्नाटक आणि तामिळनाडूसारख्या राज्यांना देखील येथून पुरवठा केला जात आहे. तसे तर केरळमध्ये काेराेना रुग्ण संख्या काही कमी नाही. परंतु केरळात प्राणवायूचा तुटवडा नाही.

पेट्राेलियमसंबंधी पेसाे संस्थेने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राज्याच्या आराेग्य विभागासाेबत मिळून पेसाेने मार्च २०२० पासून आॅक्सिजनशी संबंधित सर्व गाेष्टींवर निगराणी सुरू केली हाेती. पेसाेचे उपमुख्य नियंत्रक आर. वेणुगाेपाल म्हणाले, राज्यात पूर्वी उद्याेगांसाठी आॅक्सिजनचे उत्पादन हाेते. मेडिकल उपयाेगासाठी वळवले. राज्यात ११ एअर सेपरेशन युनिट, २३ आॅक्सिजन फिलिंग प्लांट आहेत. केरळमध्ये एका दिवसात १९९ मेट्रिक टन आॅक्सिजन उत्पादन हाेऊ शकते. ३० एप्रिल पर्यंत राज्यात १०३.५१ मेट्रिक टनची गरज पडू शकते.

वेणुगाेपाल म्हणाले, दरराेज ६३ टन आैद्याेगिक आॅक्सिजन व नायट्राेजनच्या उत्पादनात ७ टन वेस्ट आॅक्सिजन निघते. म्हणून आम्ही वेस्ट आॅक्सिजनपासून मेडिकलसाठी आॅक्सिजनचे उत्पादन केले.

 • राज्यातील ३२ रुग्णालयांत ४२० मेट्रिक टन आॅक्सिजन साठवण क्षमता.
 • पेसाेनुसार व्हेेंटिलेटरवर रुग्णाला दर मिनिटास २४ लिटर आॅक्सिजन लागते.
 • राज्यात रुग्णालयांना लहान सिलिंडरमधून आॅक्सिजनचा पुरवठा केला जाताे.
 • राज्यात एकूण २३ सिलिंडर फिलिंग प्रकल्पांची साठवण क्षमता २२५ मेट्रिक टन आहे.
बातम्या आणखी आहेत...