आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • P Chidambaram Said There Is Nothing For Poor And Migrant Laborers In The Speech Of Finance Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेगा पॅकेजवर प्रतिक्रिया:अर्थमंत्र्यांच्या भाषणात गरीब आणि प्रवासी मजुरांसाठी काहीच नाही- पी. चिदंबरम

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगालीच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी म्हणाल्या- केंद्राचे स्पेशल पॅकेज एक बिग झिरो आहे

माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणावर प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी आज जे काही म्हटले आहे, 'त्यात गरीब वर्ग आणि प्रवासी मजुरांसाठी काहीच नव्हते. मजुर आजही आपल्या राज्यात पायी चालत जात आहेत.'

चिदंबरम पुढे म्हणाले की, या भाषणाने त्यांना खूप मोठा झटका लागला आहे, जे रोज कमवून खातात. मध्यम वर्गातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत कॅश ट्रांसफर करण्याची कोणतीच सुविधा नाही. 13 कोटी कुटुंबांना बेवारस सोडण्यात आले.' यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी म्हणाल्या की, 'केंद्राच्या पॅकेजमधून नागरिकांना मदतीची आपेक्षा होती. परंतू, स्पेशल इकोनॉमिक पॅकेज एक ‘बिग झिरो’ आहे. यात राज्यांसाठी काहीच नाही.'

निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या- या पॅकेजमुळे 45 लाख उद्योगांना फायदा होआल. यावेळी सीतारमणांनी आत्मनिर्भर भारतासाठी 20 लाख कोटीच्या विशेष पॅकेज अंतर्गत कोणत्या सेक्टरला किती पैसे मिळतील, याबाबत माहिती दिली. सरकारने एमएसएमई, एनबीएफसी, एमएफआय, डिस्कॉम, रिअल इस्टेट, टॅक्स आणि कॉन्ट्रैक्टर्सला सूट देण्यासाठी 15 घोषणा केल्या. एमएमएमईला 3 लाख कोटींचे कर्ज दिले जाईल. यातून 45 लाख उद्योगांना फायदा होईल.

पंतप्रधानांच्या घोषणा म्हणजे ब्लँक पेज- चिदंबरम

चिदंबरम सकाळी म्हणाली होते की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला हेडलाइन आणि ब्लँक पेज दिला आहे. आता निर्मला सीतारमण त्यात ब्लँक पेजला कशाप्रकारे भरतात, हे पाहावे लागेल. अर्थव्यवस्थेत येणाऱ्या प्रत्येक रुपयांवर आम्ही लक्ष देऊन आहोत.'  

बातम्या आणखी आहेत...