आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Padma Awards Announced On Republic Day Former Prime Minister Of Japan Shinzo Abe, Singer S P Balasubramaniam , Sand Artist Sudarshan Sahoo, Archaeologist BB Lal Awarded Padma Vibhushan News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पद्म पुरस्कारांची घोषणा:जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह 7 जणांना पद्मविभूषण पुरस्कार, महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • गायक बालासुब्रमण्यम आणि राम विलास पासवान यांचा मरणोत्तर सन्मान

केंद्र सरकारकडून यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह 7 जणांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यात दिवंगत गायक एस पी बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे. सोबतच दहा जणांना पद्मभूषण आणि 102 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.

पद्मभूषण या विभागात महाराष्ट्रातील रजनीकांत श्रॉफ यांचा समावेश आहे. तर पद्मश्री पुरस्कारामध्ये गिरीश प्रभूणे, सिंधुताई सपकाळ, जसवंतीबेन पोपट, नामदेव कांबळे, परशूराम गंगावणे यांचा समावेश आहे.

पद्मविभूषण पुरस्कार

 1. शिंजो आबे
 2. एस पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर)
 3. डॉ. बेले मोनप्पा
 4. नरेंद्र सिंह कॅम्पनी (मरणोत्तर)
 5. मौलाना वाहिद्दुद्दीन खान
 6. बी.बी लाल
 7. सुदर्शन साहू

पद्मभूषण

 1. कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा
 2. तरुण गोगोई (मरणोत्तर)
 3. चंद्रशेखर कांबरा
 4. सुमित्रा महाजन
 5. नृपेंद्र मिश्रा
 6. रामविलास पासवान (मरणोत्तर)
 7. केशूभाई पटेल (मरणोत्तर)
 8. कालबे सादिक (मरणोत्तर)
 9. रजनीकांत श्रॉफ
 10. तारलोचन सिंह
बातम्या आणखी आहेत...