आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Padmashree Qadri Said: I Did Not Think That The BJP Government Would Give The Award, PM Modi Proved Me Wrong.

पद्मश्री कादरी म्हणाले:भाजप सरकार पुरस्कार देईल वाटलेही नव्हते, पीएम माेदींनी मी चूक हाेताे सिद्ध केले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकच्या बिदरी शिल्प कलाकार शाह रशीद अहमद कादरी यांच्यासह ५५ व्यक्तींना बुधवारी राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी पद्मने गाैरवले. समारंभानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी, गृहमंत्री शहा सर्व गाैरवमूर्तींना भेटले. माेदींनी कादरी यांना शुभेच्छा दिल्या. कादरी म्हणाले, ‘मला संपुआ सरकारकडून पद्म गाैरवाची आशा हाेती. परंतु मिळाले नाही. आपले सरकार आले. तेव्हा भाजप सरकार गाैरव करणार नाही, वाटत हाेते. मात्र मी चूक हाेताे हे तुम्ही सिद्ध केले.’ त्यावर माेदींनी स्मित केले. दरम्यान, राष्ट्रपतींनी तीन पद्मविभूषण, ५ पद्मभूषण, ४७ पद्मश्री प्रदान केले.

कादरी म्हणाले, ‘मी पद्म पुरस्कारासाठी तब्बल १० वर्षे प्रयत्न केले. दरवर्षी प्राेफाइल बनवण्यासाठी १२ हजार खर्च येत हाेता. भाजप सरकार आल्यानंतर प्राेफाइल बनवणे साेडले. भाजप सरकार मुस्लिमांना काही देत नाही असे वाटले होते.’