आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे कोरोनाने निधन, अखेरच्या व्हिडिओत म्हणाले- शो मस्ट गो ऑन

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. के.के. अग्रवाल यांच्या शेवटच्या व्हिडिओतील चित्र. - Divya Marathi
डॉ. के.के. अग्रवाल यांच्या शेवटच्या व्हिडिओतील चित्र.
  • कोरोना झाल्यानंतरही दररोज रुग्णांना ऑनलाइन सल्ला द्यायचे डॉ.के.के. अग्रवाल

प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल (६२) यांचे कोरोनानेे निधन झाले. डॉ. अग्रवाल १३ मेपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांनी सोमवारी रात्री ११:३० वाजता अखेरचा श्वास घेतला. कोरोनाकाळात सातत्याने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केल्यामुळे डॉ. अग्रवाल संपूर्ण देशाला परिचित झाले होते. त्यांनी कोरोना लसीचे दोन डोसही घेतले होते.

दुसऱ्या डोसनंतर त्यांना संसर्ग झाला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे सर्वच बुचकळ्यात पडले आहेत. संसर्ग झाल्यानंतरही रुग्णांना ते दिवसभर आॅनलाइन अथवा फोनवर सल्ला देत होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. निधनाच्या दोन आठवड्यांपूर्वीचा एक व्हिडिओ आहे. त्यात डॉ.अग्रवाल यांना ऑक्सिजन लावल्याचे दिसते. शो मस्ट गो ऑन, पिक्चर अभी बाकी है , असा राज कपूरचा डायलॉग म्हणताना ते व्हिडिओमध्ये दिसतात. मी के.के. अग्रवाल नाही. कोरोनाशी झुंजणाऱ्या डॉक्टरांचा प्रतिनिधी आहे. माझ्यासारखे लोक ऑक्सिजनवर असले तरीही क्लासेस घेऊन रुग्णांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतील. त्यांना फुप्फुसाचा आजार होता, पण नियंत्रणात होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. दररोज सकाळी फिरायला जात असत. कोरोना नियमावलीचे ते तंतोतंत पालन करीत होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशात २७० डॉक्टरांचा मृत्यू : आयएमए
दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २७० डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे आयएमएने सांगितले. सर्वाधिक ७८ मृत्यू बिहारमध्ये झाले असून उत्तर प्रदेश ३७, दिल्ली २८, महाराष्ट्र १४ आणि मध्य प्रदेशात ५ डाॅक्टरांचा मृत्यू झाला आहे.

कुटुंबीय म्हणाले, आजारातही रुग्णांवर लक्ष; विश्रांती नाही, प्रकृती बिघडली
इतरांवर उपचार करताना आपल्या आजाराकडे लक्ष दिले नसल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली,असे कुटुंबीयांनी सांगितले. २६ एप्रिल रोजी कोरोना संसर्ग झाल्याचे डॉ. अग्रवाल यांना कळले. त्या वेळी ऑक्सिजन लेव्हल ९६-९७ होती. दोन दिवसांनंतर ९२ वर घसरल्यावर त्यांनी घरीच ऑक्सिजन घेण्यास सुरुवात केली. ऑक्सिजन पुन्हा ९४-९५ वर गेला. पण त्यांनी विश्रांती घेतली नाही. ऑनलाइन सल्ला देत होते. त्याच दरम्यान त्यांना न्यूमोनियाही झाला. राष्ट्रीय हृदयरोग संस्थेत त्यांना दाखल केले.तिथे ताप उतरला नाही. ५ मे रोजी एम्स अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. १३ मे रोजी प्रकृती आणखीच खालावल्यानंतर त्यांना व्हंेटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...