आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Padmashri Kamala Forced To Dance In ICU, Odisha Hospital Controversy Video Updates | Cuttack News

पद्मश्री कमला यांना ICU मध्ये बळजबरी करायला लावला डान्स:तब्येत बिघडल्याने होत्या दाखल, म्हणाल्या- नकार देऊनही त्यांनी ऐकले नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मश्री कमला पुजारी यांना 21 ऑगस्ट रोजी मूत्रपिंडाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता कमला यांना कटकमधील रुग्णालयात जबरदस्तीने डान्स करायला लावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावर कमला पुजारी यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. कमला म्हणाल्या की, त्यांनी वारंवार नकार देऊनही ममता बेहरा नावाच्या एका सामाजिक कार्यकर्तीने त्यांना डान्स करण्यास भाग पाडले."

कमला पुजारी यांना 25 ऑगस्ट रोजी एससीबी रुग्णालयात आणण्यात आले आणि 29 ऑगस्ट रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
कमला पुजारी यांना 25 ऑगस्ट रोजी एससीबी रुग्णालयात आणण्यात आले आणि 29 ऑगस्ट रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

चौकशीसाठी समिती स्थापन

एससीबी रुग्णालयाच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख प्रा. जयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी अविनाश राऊत आणि प्राध्यापक बी. के. बेहरा हे सदस्य आहेत. समितीचे म्हणणे आहे की, ते रुग्णालयातील परिचारिका, वॉर्ड बॉय आणि कोरापुट येथील सामाजिक कार्यकर्त्यांना चौकशीसाठी बोलावतील. तपासानंतर रुग्णालय अधीक्षकांना अहवाल सादर केला जाईल.

डान्सनंतर तब्येत आणखी बिघडली

कमला म्हणाल्या- "मला तिथे नाचायचे नव्हते, पण मला ते करायला भाग पाडले. मी वारंवार नकार देऊनही तिने (ममता बेहरा नावाच्या सामाजिक कार्यकर्त्या) माझे ऐकले नाही. उलट, मला डान्स करावा लागला. मी आजारी होते. नंतर मी थकले आणि माझी प्रकृती आणखी बिघडली."

पाच दिवसांच्या उपचारानंतर पुजारी यांना सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

रुग्णालयाचे स्पष्टीकरण - कमला आयसीयूमध्ये नव्हत्या

तथापि, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्पष्टीकरणात पुजारी यांना आयसीयूमध्ये नाही, तर एका विशेष केबिनमध्ये दाखल केले होते. हॉस्पिटलचे रजिस्ट्रार डॉ. अविनाश राऊत म्हणाले- "ज्या महिला कमला यांना नाचायला लावत होत्या, त्याही त्यांना केबिनमध्ये भेटायला येत होत्या.

पुजारी यांचे परिचर राजीव हियाल यांनी सांगितले की त्या बेहरांना ओळखत नाही, ज्यांनी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांसोबत अनेक सेल्फीदेखील काढले होते.

कमला पुजारी यांना 2019 मध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भातासह अनेक पिकांच्या 100 हून अधिक देशी बियाणांचे जतन केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कमला पुजारी यांना 2019 मध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भातासह अनेक पिकांच्या 100 हून अधिक देशी बियाणांचे जतन केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

परजा समाजाकडून कारवाईची मागणी

ओडिशातील कोरापुट येथील परजा आदिवासी समुदायाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ममता यांच्यावर कारवाई न झाल्यास आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पद्मश्री पुरस्कार विजेत्या कमला पुजारी यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी कटक येथील हॉस्पिटलमध्ये डान्स करायला लावल्याचा आरोप ममतांवर आहे. एवढेच नाही तर त्या स्वतःही त्यांच्यासोबत डान्स करत होत्या.

बातम्या आणखी आहेत...