आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:‘रमजान की मौत’ लिहिणारे पद्मश्री मंजूर एहतेशाम यांनी रमजानमध्येच घेतला अखेरचा निरोप; अनेक संवेदनशील विषयांवर केले होते भाष्य

भोपाळ / अलीम बझ्मी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कथाकार, साहित्यिक, नाट्यलेखकाचे कोरोना संसर्गामुळे निधन

कथाकार, साहित्यिक, नाट्यलेखक, पद्मश्री पुरस्कारप्राप्त मंजूर एहतेशाम यांचे निधन झाले. शनिवारी रात्री त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते गेल्या १० दिवसांपासून आजारी होते. त्यांना कोरोना झाला होता. ‘रमजान’ वर त्यांनी एक कथा लिहिली होती, तिचे शीर्षक होते, ‘रमजान की मौत.’ आणि पवित्र रमजान महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला, हाही योगायोगच. ते नेहमी म्हणत असत-‘बड़े शाैक से सुन रहा था जमाना, हम ही साे गए दास्तां कहते-कहते।’

मंजूर साहेब यांचा जन्म ३ एप्रिल १९४८ ला भोपाळमध्ये झाला होता. पठाणांसारखी शरीरयष्टी. डोळ्यांवर गोल चष्मा. चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य. अत्यंत मृदुभाषी. त्यांचे व्यक्तिमत्त्व असे होते. त्यांचा स्वभाव शांत होता, पण ते लेखन परखडपणे करत असत. जुन्या रूढींवर प्रहार करण्यात ते कधीही डगमगले नाहीत. त्यांनी ‘बशारत मंजिल’ या नावाने एक कादंबरी लिहिली होती. ती राजे-राजवाड्यांच्या स्थितीवर होती. ती खूप लोकप्रियही झाली होती. ‘सूखे बरगद’ या कांदबरीत त्यांनी मुस्लिम समाजातील अंतर्विरोधाचे चित्रण केले होते. सामान्यपणे लेखक सामाजिक विकासातील अडथळ्यांवर लिहीत नाहीत, पण अशा संवेदनशील विषयांवर त्यांनी अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करत लेखन केले. ‘दास्तान-ए-लापता’ हे त्याचे एक उदाहरण आहे. झगमगाटापासून दूर राहणे हा त्यांचा स्वभाव होता. हिंदी, उर्दूएवढीच इंग्रजीवरही त्यांची पकड होती. त्यांनी हिंदीतच लेखन केले. भोपाळची संस्कृती, इतिहासाचेही ते जाणकार होते. त्यांनी इंजिनिअर व्हावे, अशी कुटुंबातील स‌र्वांची इच्छा होती. पण लेखनाच्या आवडीमुळे ते शक्य झाले नाही. उदरनिर्वाहासाठी त्यांनी आधी औषधांची विक्री केली. नंतर फर्निचर व्यवसायात उतरले. नंतर इंटेरिअर डेकोरेटर झाले. भारत टॉकीज चौकात ते राहत होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. १९७३ मध्ये लिहिली पहिली कथा, या रचनांमुळे प्रसिद्धीवर्ष १९७३ मध्ये पहिली कथा लिहिली. शीर्षक होते-रमजान की मौत. १९७६ मध्ये ‘कुछ दिन और’ ही कादंबरी लिहिली. त्यानंतर सूखा बरगद, दास्तान-ए-लापता, पहर ढलते, बशारत मंजिल यांचे लेखन.

कथासंग्रह : तसबीह, तमाशा.
नाटक : एक था बादशाह.
मिळालेले पुरस्कार : श्रीकांत वर्मा स्मृती पुरस्कार, भारतीय भाषा परिषद, कोलकात्याचा पुरस्कार, वीरसिंह देव पुरस्कार, वागीश्वरी पुरस्कार, पहल पुरस्कार, वर्ष २००३ मध्ये पद्मश्री.

बातम्या आणखी आहेत...