आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:उर्दूचे प्रसिद्ध शायर शम्सुर रहमान काळाच्या पडद्याआड, एक महिन्यापूर्वीच कोरोनावर केली होती मात

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फारुकी यांना 23 नोव्हेंबरला दिल्लीच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता

उर्दूचे प्रसिद्ध शायर शम्सुर रहमान फारुकी यांचे शुक्रवारी इलाहाबाद येथे निधन झाले. 85 वर्षांच्या फारुकी यांनी एका महिन्यापूर्वीच कोरोनावर मात केली होती. पद्मश्रीने सन्मानित फारुकी यांना 23 नोव्हेंबरला दिल्लीच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. कोरोना संक्रमण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आले होते.

त्यांचे पुतणे महमूद फारुकी यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये राहत असताना त्यांनी आपल्या घरी इलाहाबादला जाण्याचा हट्ट केला. आम्ही त्यांना घेऊन सकाळी तेथे पोहोचलो. घरी आल्याच्या अर्ध्या तासांनंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला.

30 सितंबर 1935 ला शम्सुर रहमान फारुकी यांचा जन्म झाला होता. दास्तान गोईला पुन्हा जिवंत करण्याचे श्रेय त्यांचे आहे. दास्तान गोई 16 व्या शताब्दीमध्ये उर्दू स्टोरी टेलिंगचे एक रुप आहे. 50 वर्षांपर्यंत ते उर्दूमध्ये रचना लिहित होते. यामध्ये 1989 मध्ये लिहिलेली गालिब अफसाने की हिमायत में, 2006 मध्ये आलेली मिरर ऑफ ब्यूटी (कई चांद थे सर-ए-आसमान) आणि 2014 मध्ये लिहिलेली द सन रोज फ्रॉम द अर्थ खास आहे. 1996 मध्ये त्यांना सरस्वती सम्मानही मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...