आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहम्मद शरीफ यांनाही भूमिपूजनाचे निमंत्रण:25 हजारांपेक्षा जास्त बेवारस मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार, 28 वर्षांपूर्वी मुलाच्या मृत्यूने बदलले आयुष्य

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोहम्मद शरीफ म्हणाले - माझ्यासाठी हिंदु-मुस्लिम सर्व समान, यामुळे भूमिपूजनाला जाण्यास कोणताही संकोच नाही
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा, म्हणाले - मला त्यांनी सर्वात मोठा सन्मान देऊ केलाय

अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीराम जन्मभूमिवर भव्य मंदिराचे पायाभरनी करणार आहे. अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये पाहुण्यांची यादी खूप चर्चेत आहे. एक नाव बाबरी मस्जिदचे वकील राहिलेल्या इकबला अन्सारींचे नाव आहे. तर दुसरे नाव हे मोहम्मद शरीफ यांचे आहे. इकाबाल अन्सारींचे नाव देशात चर्चित आहे. मात्र मोहम्मद शरीफ कोण आहेत? घ्या जाणून...

गेल्या वर्षी पद्मश्री देऊन करण्यात आले सन्मानित
व्यवसायाने सायकल मेकॅनिक असलेले 80 वर्षीय मोहम्मद शरीफ हे अयोध्यामध्ये 80 मोहम्मद अली बेग मोहल्ल्यात राहतात. लोक त्यांना चाचा शरीफ म्हणतात. गेल्या वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. शरीफ यांनी आत्तापर्यंत 25 हजाराहून अधिक बेवारस मृतदेहांचे प्रथेनुसार अंत्यसंस्कार केले. चे कोड बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानच्या फेऱ्या मारतात. जर ते कोणत्याही कारणास्तव पोहोचू शकत नाहीत तर पोलिस, स्मशानभूमी किंवा कब्रिस्तानच्या मॉनिटर त्यांना माहिती देतात. या कामाची संपूर्ण किंमत ते स्वत: खर्च करतात.

28 वर्षांपूर्वी सुरू केले हे काम

शरीफ यांच्यानुसार, त्यांना चार मुलं आहेत आणि यामधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा एक मुलगा शरीफ होता. तो वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होता. तो सुल्तानपूरमध्ये गेला होता. दरम्यान तो बेपत्ता झाला होता. त्या काळात अयोध्येमध्ये वादग्रस्त ढांचा पाडण्यात आला होता. जातीय दंगल पसरत होती. सुमारे एक महिन्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला. तोही दंगलीचा बळी ठरला होता. ही अशी घटना होती, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले. बेवारस मृतदेह समजून मुलाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शरीफ यांनी जिल्ह्यातील बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. आर्थिक अडचणींचा सामना करूनही त्यांनी हे काम सुरू ठेवले आहे. लोक या कामासाठी त्यांना देणगीही देतात.

मला भूमीपूजनाला जाण्यास काहीच अडचण नाही, पंतप्रधानांना भेटायची इच्छा

मोहम्मद शरीफ म्हणतात की मी कधीही हिंदू-मुस्लिम किंवा कोणत्याही धर्मात भेद केला नाही. म्हणून राम मंदिराच्या भूमिपूजनात सामील होण्यात कोणतीही अडचण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मश्रीसाठी माझ्यासारख्या व्यक्तीची निवड केली, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. आता पंतप्रधान मोदी अयोध्येत येत आहेत, त्यांना भेटण्याची इच्छा आहे.

बातम्या आणखी आहेत...