आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराTRF नंतर केंद्र सरकारने आता जैश-ए-मोहम्मदची प्रॉक्सी संघटना PAFF आणि त्यांच्या सर्व गटांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. गृह मंत्रालयाने बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 अंतर्गत ही कारवाई केली आहे. याबाबतची माहिती देत गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.
PAFF ने गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथील लष्करी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, ज्यात 4 जवान शहीद झाले होते. यावेळी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या संघटनेने काश्मीरमध्ये जी-20 बैठक आयोजित करण्याची धमकी दिली होती.
याशिवाय अरबाज अहमद मीर याला गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केले आहे. तो लष्कर-ए-तैयबासाठी काम करतो. अरबाज हा जम्मू-काश्मीरचा रहिवासी आहे, सध्या तो पाकिस्तानमध्ये राहतो.
याआधी गृहमंत्रालयाने गुरुवारी रात्री लष्करच्या प्रॉक्सी संघटना TRF वर बंदी घातली होती. जम्मू-काश्मीरमधील अनेक टार्गेट किलिंगमध्ये या संघटनेचा हात आहे. गुरुवारी रात्री उशिरा गृह मंत्रालयाने TRFवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली.
यासोबतच गृह मंत्रालयाने TRF कमांडर शेख सज्जाद गुल आणि लष्कर कमांडर मोहम्मद अमीन उर्फ अबू खुबैब यांना दहशतवादी घोषित केले होते. UAPA अंतर्गत दोघांवर ही कारवाई करण्यात आली. तूमच्या माहितीस्तव सप्टेंबर 2022 मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI वर 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. या सर्वांविरुद्ध टेरर लिंकचे पुरावे सापडले आहेत.
TRF वर बंदी का आली?
गृह मंत्रालयाने माहिती दिली की, TRF दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी, दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी, दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी आणि पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी तरुणांची भरती करत आहे. TRF वर्ष 2019 मध्ये अस्तित्वात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील तरुणांना भारत सरकारविरोधात भडकवल्याचा आरोप आहे.
त्याचबरोबर लष्कर-ए-तैयबाचा कमांडर मोहम्मद अमीन उर्फ अबू खुबाब याला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. तो जम्मू-काश्मीरचा रहिवासी आहे, सध्या तो पाकिस्तानमध्ये आहे. खुबैब हा लष्कर-ए-तैयबाचा लॉन्चिंग कमांडर म्हणून काम करत आहे, त्याचे पाकिस्तानच्या एजन्सीशीही संबंध आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.