आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • PAK Army Chief's Farewell Speech | Slams Anti army Narrative, Asks Political Stakeholders To Move Forward

पाक लष्करप्रमुखांचे निरोपाचे भाषण:बाजवा म्हणाले - लष्कर 70 वर्षे राजकारण करत राहिले, आता हस्तक्षेप करणार नाही; नेत्यांनी आपली भाषा सुधारावी

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. तत्पूर्वी बुधवारी पाकिस्तानचे लष्कर प्रमुक म्हणून अखेरचे भाषण केले. यावेळी लष्कर हे 70 वर्षांपासून देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत आल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच पण आता तसे करणार नाही, असेही बाजवा यांनी आपल्या भाषणात सांगितले.

61 वर्षीय बाजवा यांनी राजकारण्यांना आणि विशेषतः इम्रान खान यांचे नाव न घेता सल्ला दिला. लष्कराविषयी बोलताना शब्दांची निवड योग्य पद्धतीने होणे अत्यंत आवश्यक आहे. अलीकडच्या काही महिन्यांत लष्करासाठी ज्या प्रकारची भाषा वापरली जात आहे ती अत्यंत चुकीची आणि वेदनादायक आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

इम्रान खान यांच्यासोबत जनरल बाजवा (उजवीकडे). बाजवा यांच्यामुळे खान पंतप्रधान झाले. पण, सत्ता गेल्यानंतर तेव्हा बाजवा इम्रानच्या निशाण्यावर आले.
इम्रान खान यांच्यासोबत जनरल बाजवा (उजवीकडे). बाजवा यांच्यामुळे खान पंतप्रधान झाले. पण, सत्ता गेल्यानंतर तेव्हा बाजवा इम्रानच्या निशाण्यावर आले.

इम्रान यांच्यावर टीका

  • एप्रिलमध्ये सत्ता गमावलेले माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) यांनी प्रत्येक व्यासपीठावरून लष्कर आणि त्यांचे प्रमुख जनरल बाजवा यांच्यावर टीका केली. सैन्याच्या पाठिंब्यावरच खान हे सत्तेवर आले होते. पण, जेव्हा ते प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरु लागले. तेव्हा सैन्याने त्यांना साथ देणे बंद केले आणि खान यांचे सरकार पडले. तेव्हापासून इम्रान जनरल बाजवा यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरत आले आहेत.
  • खान यांनी बाजवा यांना देशद्रोही म्हटले होते. बाजवा म्हणाले की, नवीन सरकार आयात केलेले आणि निवडलेले म्हटले जात आहे. आम्हाच्यावर टीका करण्यात येत आहे. हे थांबले पाहिजे.
  • लष्करप्रमुख या नात्याने मी आज शेवटच्या वेळी देशाशी बोलत आहे. लष्कराने 70 वर्षे राजकारणात हस्तक्षेप केला. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आम्ही निर्णय घेतला होता की आता आम्ही राजकीय गोष्टींपासून दूर राहू. मी गेल्यावरही ही प्रक्रिया सुरूच राहील.

सैन्याला खलनायक बनवले जात आहे
बाजवा पुढे म्हणाले की, लष्कराबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. लोकांना भडकावले जात आहे. एवढेच नाही तर जेव्हा टीका केली जाते. तेव्हा स्वर आणि शब्द खूप वाईट असतात. याची काळजी घेतली पाहिजे. लष्कराने चुका केल्या नाहीत असे मी म्हणत नाही. कोणतीही संस्था चुका करू शकते. बाजवा यावेळी भावूक झाले. ते म्हणाले की, आम्ही देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले आणि आज आमच्यावर अन्याय होत आहे. जे शहीद झाले त्यांना मी सलाम करतो.

ते म्हणाले की, आता वेळ आली आहे की आपला स्वार्थ आणि अहंकार बाजूला ठेवून फक्त देशाचा विचार केला पाहिजे. पाकिस्तान सध्या अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहे. आपली अर्थव्यवस्था सर्वात वाईट टप्प्यात आहे. राजकारणात जय-पराजय होत आला आहे आणि होत राहील. गरज आहे ती सर्व राजकीय पक्षांनी आपली मग्रुरी सोडून एकत्र येण्याची आणि भूतकाळातील चुकांमधून शिकून देशाला या परिस्थितीतून बाहेर काढण्याची. लोकशाहीचाच मार्ग अवलंबायचा आहे.

1971 च्या पराभवाचाही उल्लेख केला
1971 च्या युद्धात भारताचा पराभव आणि बांगलादेशच्या जन्माचाही उल्लेख जनरल बाजवा यांनी आपल्या भाषणात केला. ते म्हणाले की, 1971 मध्ये सेना अपयशी ठरली होती, यावर माझा विश्वास नाही. जर कोणी अपयशी ठरले असेल तर ते आपले राजकारणी होते. त्यावेळी 92 हजार नाही तर केवळ 34 हजार सैनिक रणांगणात होते. भारताच्या 2 लाख 50 हजार सैनिकांसोबत मुक्तीवाहिनीचे 2 लाख सैनिकही होते. असे असूनही आपण धैर्याने लढलो. याचा उल्लेख तत्कालीन भारतीय लष्करप्रमुख फील्ड मार्शल माणेकशॉ यांनीही केल्याचे बाजवा यांनी सांगितले.

बाजवा हे वर्षे लष्करप्रमुख राहिले. 2016 मध्ये त्यांनी लष्कराची सूत्रे हाती घेतली. घटनादुरुस्तीनंतर त्यांना 3 वर्षांची मुदतवाढ मिळाली. आता त्यांना आणखी एक मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु त्यांनी निवृत्ती घेण्याचे ठरवले.

असीम मुनीर होणार पाकचे नवे लष्करप्रमुख

लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख असतील. ते आयएसआयचे प्रमुख राहिले आहेत. इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. असीम 2018-2019 मध्ये 8 महिने ISI प्रमुख होते. सत्तेत आल्यानंतर इम्रान खान यांनी त्यांचे जवळचे सहकारी फैज हमीद यांना आयएसआय प्रमुख बनवले आणि मुनीर यांची गुजरांवाला कॉर्प्स कमांडर म्हणून बदली केली. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...