आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pak Connection Of Kanpur Violence, The Historian Said To The Pakistani Leader Sheikh Saheb Wants More Bombs, It Will Work

कानपूर हिंसाचाराचे पाक कनेक्शन:हिस्ट्रीशीटर पाकिस्तानी म्होरक्याला म्हणाला- शेख साहेब आणखी बॉम्ब हवेत, काम होईल

कानपूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कानपूर हिंसाचारात पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे. नई सडक आणि दादा मियाँ परिसरामध्ये झालेल्या गदारोळात एका नंबरवरून सतत पाकिस्तानशी बोलले जात होते. तो क्रमांक अकील खिचडी नावाच्या हिस्ट्री शीटरचा आहे. हिंसाचारानंतर तो फरार आहे. अकील खिचडी हा बाबा बिर्याणीचे मालक बाबा मुख्तारचाही खास असल्याचे समोर आले आहे.

बाबा मुख्तारला बुधवारी कोर्टात हजर केल्यानंतर एसआयटीने त्याला तुरुंगात पाठवले आहे. आतापर्यंतच्या तपासात बाबा मुख्तारनेच हिंसाचाराच्या आरोपींना आर्थिक मदत केल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यांच्या हस्तकाने रुमाल हलवताच जमाव चंद्रेश्वर गेटकडे धावून गेला होता.

अकीलने लिहिले होते - शेख साहेब आणखी बॉम्ब पाहिजे

एका माहिती देणाऱ्याने अकील खिचडीच्या मोबाईलचा स्क्रीन शॉट पोलिसांना दिला आहे. अकील खिचडी ज्यावर बोलत होता तो पाकिस्तानी नंबरही त्यात आहे. त्यात अकीलने लिहिले की, "शेख साहेब आणखी बॉम्ब हवे आहेत. काम होऊन जाईल.''

बाबा मुख्तारच्या या कर्मचाऱ्याने रुमाल हलवल्यानंतर नई रोडवर हिंसाचार उसळला.
बाबा मुख्तारच्या या कर्मचाऱ्याने रुमाल हलवल्यानंतर नई रोडवर हिंसाचार उसळला.

डेटा फिल्टरेशनमध्ये पाकिस्तानी कनेक्शन उघडले

3 जून रोजी कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचार झाला होता. या घटनेचा तपास करणाऱ्या एसआयटीने हिंसाचारग्रस्त भागातील मोबाइल टॉवरचा डेटा स्कॅन केला आहे. यादरम्यान पाकिस्तानी नंबरवरून कानपूरच्या अकील खिचडीची माहिती समोर आली. तो एक धूर्त गुन्हेगार आहे आणि दाऊदसाठी काम करणाऱ्या D-2 टोळीचा सदस्य आहे. त्याच्यावर कर्नलगंज पोलिस ठाण्यात 21 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आता डी-2 टोळीचा अध्याय कायमचा बंद केला आहे.

दुसरीकडे, हिंसाचाराला जवळपास 20 दिवस उलटल्यानंतर समोर आलेल्या पाकिस्तानी कनेक्शनमुळे आता अधिकाऱ्यांची झोप मात्र उडवली आहे. गम्मू खानच्या घरी राहणाऱ्या अकील खिचडीचा तीव्र शोध पोलीसांनी सुरु केला आहे. त्याच्या अटकेसाठी इतर यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे.

शुक्रवारच्या नमाजानंतर जमावाने अचानक दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली.
शुक्रवारच्या नमाजानंतर जमावाने अचानक दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली.

सीसीटीव्हीवरून मुख्तार बाबाची ओळख उघड

चंद्रेश्वर गेटबाहेर रुमाल बांधून हिंसाचाराला भडकावणाऱ्या व्यक्तीची एसआयटीने ओळख पटवली आहे. रुमाल हलवणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून तुरुंगात पाठवण्यात आलेला आरोपी मुख्तार बाबाच्या बाबा बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये काम करणारा कर्मचारी आहे. पोलिसांनी त्याचे नाव आणि पत्ता काढला आहे. त्याच्या अटकेसाठी पथक छापा टाकत आहे. यावरून हे स्पष्ट झाले की, मुख्तार बाबा हिंसाचारासाठी निधी पुरवण्यात पूर्णपणे सहभागी होता.

SIT चा दावा - हिंसा भडकवण्याचे 2 हेतू

या हिंसाचारामागे दोन कारणे असल्याचा दावा एसआयटीने तपासात केला आहे. नूपुर शर्माच्या वक्तव्याने जागतिक स्तरावर भारताची बदनामी करण्याचा पहिला मुद्दा होता. दुसरे, हिंसाचाराचे दुसरे कारण म्हणजे चंदेश्वर परिसर रिकामे करण्याची योजना होती. आता त्या भागात हा एकमेव हिंदू परिसर उरला आहे. बाकीचा परिसर मुस्लिमबहुल झाला आहे.

कानपूर हिंसाचारात एकूण 7 एफआयआर

कानपूरमधील हिंसाचारानंतर पोलिसांनी बेकनगंज पोलिस ठाण्यात 3 एफआयआर नोंदवले होते. यामध्ये 43 नावे आणि 1000 हून अधिक अनोळखी लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट करणाऱ्या लोकांविरोधात 4 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. SIT हिंसाचाराशी संबंधित 3 FIR चा तपास करत आहे.

कानपूर हिंसाचारप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आतापर्यंत ५८ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलानेही पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. मुख्तार बाबाची ही ५९वी अटक आहे. यापूर्वी पोलिसांनी सपाचे माजी नेते निजाम कुरेशी यांना अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...