आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pak Marines Walk Across The Maritime Border With Gujarat, Helicopters With 5 Warships Also Appeared

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समुद्री सीमेवर पाकच्या हालचाली:​​​​​​​गुजरातजवळली पाकिस्तानच्या समुद्री सीमेवर लढाऊ जहाज आणि हेलिकॉप्टर दिसले, सुरक्षादल सतर्क

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर कच्छला पोहोचला आहे

आरबी समुद्रात गुजरातजवळील पाकिस्तानच्या सुमुद्री सीमेवर अचानक पाकिस्तानी मरीनच्या हालचाली वाढल्या आहेत. यानंतर भारतीय एजेंसी आणि सुरक्षादल सतर्क झाले आहेत. सोमवारी आंतरराष्ट्रीय मरीन बाउंड्री-लाइनजवळ पाक मरीनचे 5 लढाऊ जहाज आणि एक हेलिकॉप्टर दिसले.

बाउंड्री लाइनवरील दृष्यांवरुन असे वाटत होते की, मरीनची एक्सरसाइज सुरू आहे. मात्र पाकिस्तानची ही अॅक्टिव्हिटी त्यांच्या समुद्री सीमेवर होत होती, मात्र भारतीय सुरक्षादलांची बारीक नजर होती. काही तासांच्या अॅक्टिव्हिटीनंतर सर्व जहाज आणि हेलिकॉप्टर कराचीकडे रवाना झाले.

पाक मरीनने सप्टेंबरमध्ये 40 मासेमाऱ्यांचे अपहरण केले होते
पाक मरीन, भारतीय मासेमारांना त्रास देत राहतात. नेहमीच मासेमाऱ्यांचे अपहरण आणि त्यांच्यावर फायरिंगच्या घटना समोर येत राहतात. सप्टेंबरमध्ये पाक मरीनने आठ नावांमध्ये सवार 40 भारतीयांचे अपहरण केले होते. सध्या हे सर्व कराचीच्या तुरुंगात आहेत. त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर कच्छला पोहोचला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आता कच्छ (गुजरात) सीमेवर पोहोचला आहे. कच्छला लागून असलेल्या सीमा क्षेत्रातील चिनी कंपन्यांना जमीनदेखील देण्यात आली आहे. रस्ते बांधकाम व्यतिरिक्त या कंपन्या येथे खाण व वीजनिर्मिती करत आहेत. चीनपासून सुरू होणारा चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर कच्छलगतच्या पाकिस्तान सीमेवर संपतो.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser