आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान सीमेत शिरलेला घुसखोर आमचा नागरिक:पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली; BSF ने घुसखोराचा मृतदेह पाक रेंजर्सना सोपवला

अनुपगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-पाकिस्तान सीमेवर मारला गेलेला घुसखोर आपलाच नागरिक असल्याची कबुली पाकने दिली आहे. फ्लॅग मीटींगनंतर बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी घुसखोराचा मृतदेह पाकिस्तानी रेंजर्सकडे सोपवला. हा घुसखोर श्रीगंगानगरच्या अनुपगडमधील शेरपुरा पोस्टजवळ मारला गेला होता.

फ्लॅग मीटींगनंतर बीएसएफ अधिकाऱ्यांनी मृतदेह पाक रेंजर्सना सोपवला.
फ्लॅग मीटींगनंतर बीएसएफ अधिकाऱ्यांनी मृतदेह पाक रेंजर्सना सोपवला.

फ्लॅग मीटींगमध्ये मागितला घुसखोराचा फोटो

बीएसएफने 28 ऑक्टोबर रोजी शेरपुरा पोस्टजवळ एका पाकिस्तानी घुसखोराला भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर मारले होते. घुसखोराविषयी पाकिस्तानसोबत फ्लॅग मीटींग करण्यात आली. पाक रेंजर्सनी ओळख पटवण्यासाठी बीएसएफ अधिकाऱ्यांकडे त्याचा फोटो मागितला होता. पडताळणीनंतर तो घुसखोर मुनीब आसिफ पुत्र मोहम्मद आसिफ असल्याची ओळख पटली. पाकिस्तानच्या बहावलगनगरमधील चक 269 चा तो रहिवासी होता. यानंतर ते त्याचा मृतदेह घेण्यासाठी राजी झाले.

पाकिस्तानने अनेकदा घुसखोर आपले नागरिक असल्याची कबुली दिली नाही

यापूर्वीही पाकिस्तानातून भारतात घुसखोर शिरल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अनेकदा या घुसखोरांना मारण्यात आले आहे. मात्र पाकिस्तानने कधीही ते आपले नागरिक असल्याची कबुली दिली नव्हती. पाकिस्तानी रेंजर्स कायम मृतदेह घेण्यास नकार देत राहिले आहेत. बीएसएफ अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी मृतदेह सोपवण्यापूर्वी त्याला पुष्पांजली वाहिली. नंतर मृतदेह पाकिस्तानी रेंजर्सना देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...