आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब सीमेवर पाकिस्तानमधून पुन्हा आले ड्रोन:BSF जवानांनी केली 40 राउंड फायरिंग, 6 प्रकाश बॉम्बही टाकले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब सीमेवर धुक्याचा फायदा घेत पाकिस्तानी तस्कर सातत्याने घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. शनिवारीही गुरुदासपूर सेक्टरमध्ये ड्रोनची हालचाल दिसून आली. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी गोळीबार करून ड्रोनला परत जाण्यास भाग पाडले. त्यानंतर परिसरात सर्च ऑपरेशनही करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11.30 वाजता गुरुदासपूर सेक्टर अंतर्गत बीओपी चंदुवडाला येथे ड्रोनची हालचाल दिसली. त्यावेळी बटालियन 89 चे सैनिक गस्तीवर होते. ड्रोनचा आवाज येताच जवानांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी सुमारे 40 राऊंड गोळीबार केला. एवढेच नाही तर ड्रोनच्या हालचाली जाणून घेण्यासाठी 6 प्रकाश बॉम्बही टाकण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली.

परिसरात सर्च ऑपरेशन
बीएसएफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. डीआयजी प्रभाकर जोशी यांनी सांगितले की, जवानांनी गोळीबार करून ड्रोनला परत जाण्यास भाग पाडले. दक्षतेसाठी शोधमोहीम राबवली जात आहे, मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही.

बातम्या आणखी आहेत...