आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistan Drone Movement At Border | Three Drones In Two Days At Punjab | Punjab News

पंजाब सीमेवर पुन्हा पाकिस्तानी ड्रोन:रात्री दोनदा आले, BSFने 98 राउंड फायर करून परत पाठवले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब सीमेवर रात्रीच्या वेळी पाकिस्तानकडून वारंवार ड्रोन येणे सुरु आहे. धुक्याचा फायदा घेत पाक तस्कर भारतीय सीमेवर हेरॉईन आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा नापाक प्रयत्न करत आहेत. पंजाबच्या गुरुदासपूर सेक्टरमध्ये रात्री दोनदा ड्रोनची हालचाल पाहायला मिळाली. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी सुमारे 100 राउंड फायर करून ड्रोनला परत पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदासपूर सेक्टरमध्ये रात्री दोनदा ड्रोनची हालचाल पाहायला मिळाली आहे. गुरुदासपूरमधील बीओपी चंदूवडाला येथे रात्री 10:20 वाजता ड्रोनचा आवाज आला. जवानांनी 26 राऊंड फायर केले. ड्रोनची योग्य हालचाल पाहण्यासाठी 6 प्रकाश बॉम्बही टाकण्यात आले. त्यानंतर ड्रोन पाकिस्तानात परतले.

गोळीबारानंतर ड्रोन पाकिस्तानात परतले
चंदूवडाला घटनेनंतर काही मिनिटांनी 10:48 वाजता पुन्हा ड्रोनचा आवाज आला. हा आवाज बीओपी कस्सोवाल परिसरात ऐकू आला. त्यानंतर तैनात जवानांनी गोळीबार सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी जवानांनी 4 प्रकाश बॉम्ब टाकून ड्रोनचा मागोवा घेतला. तेथे 72 राउंड फायर करण्यात आले. त्यानंतर ड्रोन पाकिस्तानी सीमेवर परतले.

परिसरात सर्च ऑपरेशन सुरु
घटनेनंतर बीएसएफ आणि स्थानिक पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या घटनांवर नजर टाकली तर गुरदासपूर परिसरात पोलिसांनी अनेकदा आरडीएक्स आणि ग्रेनेड जप्त केले आहेत. तेव्हापासून या भागातील ड्रोनच्या हालचालीवर विशेष नजर ठेवण्यात आली आहे.

दोन दिवसात तीन घटना
गुरुदासपूर सेक्टरमध्ये गेल्या दोन दिवसांत ड्रोनच्या तीन घटना समोर आल्या आहेत. ही चिंतेची बाब आहे. गुरुदासपूरच्या चंदूवडाला गावात शनिवार-रविवारी रात्रीही ड्रोनची हालचाल पाहायला मिळाली होती. त्यानंतर शोध घेण्यात आला, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही.

बातम्या आणखी आहेत...