आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालाकोट हवाई कारवाईला शनिवारी तीन वर्षे पूर्ण झाली. पुलवामावरील हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने सीमापार जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्या कारवाईनंतर जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर तैनात जवानांना अत्याधुनिक शस्त्रांद्वारे सज्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या काळात जम्मू-काश्मीरच्या ७५० किमी सीमावर्ती भागातील रहिवासी शांततेत राहू लागले. परंतु सीमेवर जवान अलर्ट मोडवर आहेत. कारण दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या कोणत्याही प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी ते सज्ज आहेत. २४ व २५ फेब्रुवारीला झालेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनानंतर भारतीय सैन्याची दहशतवाद्यांचे प्रशिक्षण अड्डे व सीमेजवळील बांधकामासारख्या कारवायांकडे बारीक नजर आहे.
त्यातही पाकिस्तानच्या लष्कराचे नुकसान झालेल्या भागावर भारतीय लष्कराचे लक्ष आहे. आय सेक्युरिटी अॅसेसमेंट अहवालात असे म्हटले आहे. पाकिस्तानने मधल्या काळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पायाभूत बांधकाम उभे करण्याचे काम केल्याचे वास्तवात दिसून येते. श्रीनगरमध्ये एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत अफगाणिस्तानातून पाकिस्तानात परतलेल्या दहशतवाद्यांसंबंधी चर्चा करण्यात आली. अशा दहशतवाद्यांचा खात्मा केला जाणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार जम्मू-काश्मीरजवळ १६० दहशतवादी सक्रिय आहेत. त्याशिवाय २०० दहशतवादी लाँचिंग पॅडवर घुसखोरी करण्यासाठी आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. २०२१ पासून सुरू असलेल्या १०० हून जास्त ऑपरेशनमध्ये १८२ दहशतवादी, ४४ कमांडरसह २० परदेशी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. संघटनांनी १५ ते १७ वयोगटातील मुलांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादी केले आहे, ही चिंतेची बाब आहे.
जवानांना फिनलंडची स्नायपर, इस्रायली एलएमजी
एलओसीवर तैनात भारतीय जवानांना फिनलंडचे स्नायपर, इस्रायली एलएमजी रायफलने सज्ज करण्यात आले आहे. फिनलंडच्या साको टीआरजी ४२ स्नायपर राफलला फिनिश गनमेकर साकोने विकसित केले आहे. ही रायफल शक्तिशाली कार्टेजच्यादृष्टीने विकसित करण्यात आली आहे. तिचे वजन पाच किलो असून १५०० मीटरपर्यंतचा लक्ष्यभेद करते. इस्रायलच्या एलएमजीने सिंगल बुलेटही डागता येते. स्वयंचलित पद्धतीने यातून एका मिनिटात ७०० गोळ्या झाडता येतात. त्याचे वजन ७.५ किलो आहे. एलएमजीने वाहन, हेलिकॉप्टर, जहाजालादेखील लक्ष्य करता येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.